शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेत ८५ टक्के नवखे उमेदवार

By admin | Updated: February 5, 2017 23:25 IST

सत्त्वपरीक्षा : विद्यमान नऊ नगरसेवक रिंगणात

नाशिक : गेल्या पाच वर्षांत महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या मनसेने यंदा महापालिका निवडणुकीत घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ८५ टक्के चेहरे हे नवखे आहेत. पाच वर्षांत ४० पैकी ३० नगरसेवक सोडून गेल्याने मनसेने शिल्लक १० पैकी ८ नगरसेवकांसह एका स्वीकृत नगरसेवकाला उमेदवारी बहाल केली आहे, तर दोन नगरसेवकांनी पुन्हा न लढण्याचे ठरविले आहे. नवख्या लोकांना सोबत घेऊन मनसेचे राज ठाकरे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार असून, पक्षाची सत्त्वपरीक्षा आहे.  मागील पंचवार्षिक निवडणुकीसाठी मनसेने सर्वच्या सर्व १२२ उमेदवार दिले होते. त्यात ४० उमेदवार निवडून आले होते. मात्र, पाच वर्षांत पक्षाची वाताहत झाली आणि तब्बल ३० नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला. आता उरलेल्या दहा नगरसेवकांना सोबत घेऊन मनसेने पुन्हा एकदा महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पाहिले आहे. पक्षाची पुरती वाताहत झाली असताना आणि पक्षाच्या एकूण अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लटकले असताना यंदा तब्बल १०३ उमेदवारांची यादी मनसेने घोषित केली आहे. त्यात १५ टक्के अनुभवी व ओळखीचे चेहरे वगळता इतर सर्व उमेदवार हे नवखे आहेत. त्यातील अनेक जण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रामुख्याने, पक्षाकडे तरुण उमेदवारांची फळी मोठी असल्याने राज ठाकरे यांच्याकडून प्रचारातही तोच मुद्दा पुढे केला जाण्याची शक्यता आहे.  मनसेने पक्षात उरलेले महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृहनेता सुरेखा भोसले, नगरसेवक सविता काळे, मेधा साळवे, कांचन पाटील, गटनेता अनिल मटाले, अर्चना जाधव यांच्यासह स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली आहे. याशिवाय, काही माजी नगरसेवकांनाही पक्षाने उमेदवारी बहाल केलेली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची सारी धुरा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर असणार असून, येत्या १७ फेबु्रवारीला राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी पक्षाने गोल्फ क्लब मैदान आरक्षित केले आहे. यंदा राज ठाकरे प्रचारात नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)