नाशिक : कोरोना संकटात एकीकडे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसताना दुसरीकडे नाशिकरोड भागातील एका ८० वर्षांच्या आजींनी एचआरसीटीचा स्कोर ११पर्यंत पोहोचलेला असताना सकारात्मक आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर तब्बल २५ दिवस कडवी झुंज देत यशस्वी मात केली.
नाशिकरोड येथील कदम कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी कोरोनाचे संकट ओढावले आणि संपूर्ण कदम कुटुंबाची घडीच विस्कटली होती. कुटुंब प्रमुख विनोद कदम, त्यांची पत्नी स्वपना कदम, मुलगा रोशन कदम व घरातील सून गांधाली भूषण कदम आदी सदस्यांना संसर्ग झाल्याने अशक्तपणा जाणवत असतानाच कुटुंबातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेल्या ८० वर्षांच्या आजी शकुंतला दशरथ कदम यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली, शहरातील रुग्णांची वाढलेली संख्या व त्यातच आजींचे वय जास्त असल्यामुळे कोणत्याही रुग्णालयात त्यांना बेड उपलब्ध होऊ शकला नाही. एकीकडे कुटुंबातील मोठा मुलगा भूषण कदम हे एकटेच कुटुंबीयांची देखभाल करीत असताना दुसरीकडे शकुंतलाबाईंचे वय अधिक असल्याने त्यांच्यासमोर त्यांची देखभाल करण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थिती शकुंतलाबाईंनी धीर सोडला नाही, या संकटातूनही बाहेर पडू, असा आत्मविश्वास त्या व्यक्त करीत होत्या. मात्र त्यांना जेवणही करता येत नव्हते. अखेर त्यांची लेक अंजली जगताप यांनी त्यांचा मुलगा मंगेश जगताप याच्यासोबतीने कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी घेत आजींची जबाबदारी उचलली. त्यांना दिवसभरात थोडेफार पाणी किंवा दोन ते तीन चमचे सूप देण्यापासून सुरुवात करीत शकुंतलाबाईंची अगदी लहान मुलाप्रमाणे सुश्रुषा केली. त्यामुळे शकुंतलाबाईंचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आणि त्यांनी कोणत्याही औषधोपचाशिवाय कोरोनावर मात केली.
इन्फो -
शकुंतलाबाई सांगतात त्यांच्या आजींचे किस्से
कोरोनाची बाधा झाल्यानंतर २० ते २५ दिवसांनी त्यांची पुन्हा चाचणी केली. तेव्हा त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि कुटुंबातील सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. आता शकुंतला आजी पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, नियमिपणे दोन वेळेचे जेवण करीत त्यांच्या आजीच्या बटव्यातील औषधांच्या आणि साथीच्या रोगांच्या मजेदार गंमती कुटुंबीयांना ऐकविताना रमून जाताना दिसत आहेत.
कोट-
मावशी व तिचा मुलगा कोरोना निगेटिव्ह असताना त्यांनी तिची जबाबदारी घेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर एखाद्या नर्सप्रमाणे काळजी घेतली. त्यामुळे कोणत्याही औषधोपचाराशिवाय आजी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू शकली.
मंजिरी काकळीज, शकुंतला कदम यांची नात
===Photopath===
030621\03nsk_34_03062021_13.jpg
===Caption===
शकुंतला कदम