शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७८ शस्त्रपरवानाधारक गायब?

By admin | Updated: August 12, 2016 23:56 IST

माहिती देण्याचे आवाहन : परवाने होणार रद्द

अहमदनगर : एमआयडीसीतील भूखंडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरकार उद्योजकांची बाजू मांडणार असल्याचे सांगून कायद्याच्या चौकटीत राहून सरकार उद्योजकांनामदतीचा प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील वाटप झालेल्या बेकायदेशीर भूखंड ताब्यात घेवून त्याचा पुन्हा लिलाव करण्याचा उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केला़ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सरकार आदर करत आहे़ न्यायालयाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेवून न्यायालयात उद्योजकांची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सरकार उद्योजकांना मदत करील़ यासंदर्भात स्थानिक उद्योजकांनी आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनावणे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली़ चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनीही सरकारच्या वतीने उद्योजकांची बाजू मांडण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले आहे़ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी प्रयत्नशील आहेत, असे पेशकर म्हणाले़ ताब्यात घेणाऱ्या भूखंडांवर सुक्ष्म व लघु उद्योग सुरू आहेत़ प्रशासनाच्या धोरणानुसारच भूखंड घेवून उद्योजकांनी कारखाने सुरू केले आहेत, अशी स्थानिक उद्योजकांची खात्री आहे़ कारखाने उभे करण्यासाठी उद्योजकांनी कर्ज घेतले आहे़ कर्ज घेवून कारखाने सुरू करण्यात आले आहे़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देश व कागदपत्रांच्या आधारे कार्यवाही होते़ त्यानुसार सुरू झालेले हे कारखाने अचानक संकटात सापडले आहेत़ भूखंड वाटपात तांत्रिक चुका तत्कालीन अधिकाऱ्यांनी केल्या़ हे भूखंड नियमित करण्याचे धोरण ठरविण्यात आले़ त्याआधारे उद्योजकांनी १० टक्के दंड भरून ते नियमित करून घेतले़ भूखंड नियमित होऊनही उद्योजक अडचणीत आले आहेत़ या संपूर्ण प्रकराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पेशकर म्हणाले़ पत्रकार परिषदेस अशोक सोनवणे, अरुण कुलकर्णी, प्रवीण बजाज आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी बैठकपालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागापूर औद्योगिक वसाहतीत रविवारी बैठक होत आहे़ बैठकीत भूखंड वाटप आणि न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा होणार आहे़ यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी उद्योजकांनी केली होती़ त्यानंतर भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी शुक्रवारी नगर येथे येवून उद्योजकांशी चर्चा केली़ आता पालकमंत्री शिंदे उद्योजकांची स्वतंत्र बैठक घेत असून, या बैठकीत शिंदे काय भूमिका घेतात, याकडे उद्योजकांचे लक्ष आहे़राज्यातील भूखंड घोटाळ्याची चौकशीची मागणीराज्यातील भूखंड घोटाळ्यांची तातडीने चौकशी करावी़ चौकशीत दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेने निवेदनाव्दारे लोकायुक्तांकडे केली आहे़सदर भूखंडांचे वाटप शासनाचे नियम पायदळी तुडवून करण्यात आले आहे़ त्यावर न्यायालयाने निर्णय दिला़ हा निर्णय उद्योजक व कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे़ भूखंड वाटप प्रक्रियेतील ठराविक अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार इतर लोकांना जीवनातून उठवू शकतो, हे सिध्द करणार असल्याचे माजी राज्य कार्यकारणी सदस्य शाम असावा यांनी निवेदनात नमुद केले आहे़