शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून लॅपटॉपसह ७२ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:51 IST

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथे पशु-खाद्य विक्रीचे जान्हवी ट्रेडिंग दुकानाचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्याने ६२ हजारांची रोकड व लॅपटॉप असा ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला.

ठळक मुद्देदुकानाचे शटर उचकटलेले दिसून आलेघरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथे पशु-खाद्य विक्रीचे जान्हवी ट्रेडिंग दुकानाचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्याने ६२ हजारांची रोकड व लॅपटॉप असा ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला.चेहडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथे राहणारे भगवान तुकाराम आडके यांचे सिन्नरफाटा येथे पशुखाद्य विक्रीचे जान्हवी ट्रेडिंग दुकान आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास आडके यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. आडके सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील ६२ हजार रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आडके यांच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेल्या फुटेजनुसार सदर चोरी रात्री २ वाजेच्या सुमारास झाली. त्यामध्ये चोरट्यांचा चेहरा कैद झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ६५ हजारांची घरफोडीबंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शरणपूर लिंकरोड परिसरात घडली़ न्यू कृष्णा विहार अपार्टमेंटमधील रहिवासी श्रीकांत कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरातील ४० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व पाच हजार रुपयांची हार्डडिस्क असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़