शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

डेबिट कार्डाची आदलाबदल करत ७० हजारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

याप्रकरणी हबीब बेग मोगल बेग मिर्झा (रा. ड्रिमपार्क, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

याप्रकरणी हबीब बेग मोगल बेग मिर्झा (रा. ड्रिमपार्क, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार मिर्झा हे ३१ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास द्वारका येथील स्टेट बॅंकेच्या एटीएम केंद्रात गेले होते. यावेळी पैसे काढण्यासाठी त्यांनी एका अज्ञात व्यक्तीकडे मदत मागितली व आपले डेबिट कार्ड त्याच्याकडे दिले. मात्र, त्या अज्ञात व्यक्तीने रक्कम यंत्रातून येत नसल्याचे भासवून मिर्झा यांचे कार्ड स्वत:जवळ ठेवले व त्याच्याकडे असलेले दुसरे बंद डेबिट कार्ड मिर्झा यांना दिले. त्यानंतर काही वेळाने मिर्झा यांच्या खात्यातून त्या संशयित चोरट्याने २९ हजार ३८ रुपयांची रक्कम काढली. तसेच ३९ हजार ९२९ रुपयांची कार्डद्वारे ऑनलाईन खरेदी करत त्यांची एकूण ६८ हजार ९६७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राऊत अधिक तपास करत आहे.

---

कारच्या धडकेत वृद्ध ठार

नाशिक : रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली. सुभाष वामन दाणी (६३, रा. दादासाहेब गायकवाडनगर) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील दिगंबर पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १५ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुभाष दाणी हे म्हसरुळ परिसरात रस्ता ओलंडत असताना दिंडोरीकडून नाशिककडे येणाऱ्या अज्ञात भरधाव कारने दाणी यांना धडक दिली. त्यामुळे दाणी यांचे डोके व हातापायास गंभीर मार लागला होता. त्यांना उपारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

---

वाहनांच्या धडकेत दोघे जखमी

नाशिक : भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत शनिवारी (दि. २) सकाळी देवळाली-पाथर्डी रस्त्यावर दुचाकीस्वार सचिन एकनाथ लोखंडे (रा. शनिमंदिरामागे, पाथर्डी फाटा) हा युवक जखमी झाला. शनिवारी लोखंडे हे नाशिकरोडकडून पाथर्डी फाट्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या कारच्या (एमएच १५ ईएक्स ५२१०) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे.

दुसऱ्या घटनेत भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने रविवारी रात्री बेळगाव ढगा परिसरात कुंडलिक लक्ष्मण गांगुर्डे (६६) हे वृद्ध जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गोटीराम जाधव (रा. कोळीवाडा, बेळगावढगा) याच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.