शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत रस्ते बांधणीवर ७०० कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:41 IST

नाशिक : गेल्या दोन वर्षांत रस्त्यांवर तब्बल ७०० कोटी रुपये खर्च होऊनही पावसाने काही भागांत महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

धनंजय वाखारे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दोन वर्षांत आधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ४६५ कोटी, तर नंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९२ कोटी रुपये केवळ रस्त्यांच्या कामांवर खर्च करणाऱ्या नाशिक महापालिकेचा आर्थिक संसार कष्टदायक बनला असतानाही चालू आर्थिक वर्षात सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा रस्त्यांसाठी तब्बल ३०० कोटी रुपये ओतण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षांत रस्त्यांवर तब्बल ७०० कोटी रुपये खर्च होऊनही पावसाने काही भागांत महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  सन २०१५-१६ मध्ये नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा पार पडला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने महापालिकेला सुमारे ११५० कोटी रुपये अनुदान दिले. त्यातील ४६५ कोटी रुपये महापालिकेने केवळ रस्ते बांधणीवर खर्च केले. सन २००३-०४ च्या सिंहस्थात झालेल्या काही बाह्य रिंगरोडवरच पुन्हा डांबर ओतण्याचा प्रकार झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान पेटविले होते. सिंहस्थाच्या काळात काही नव्याने रिंगरोड व पुलांची निर्मिती झाली. त्यामुळे बाह्य लिंकरोड चकचकीत झाले. मात्र, त्यावेळी शहरातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले. त्याबद्दलही सत्ताधारी मनसेविरुद्ध टीका झाली. सन २०१५-१६ मध्ये सुमारे ४६५ कोटी रुपये रस्तेविकासावर खर्च झाल्यानंतर २०१७मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी कॉलनीरोडच्या कामांसाठी १९२ कोटी रुपये खर्चाची तरतूद करुन घेतली. त्यानुसार, अजूनही त्याअंतर्गत कामे सुरु आहेत.  तत्पूर्वी, महापालिका आयुक्तांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात रस्ते बांधणीसाठी ४९.६६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात खडीचे रस्ते तयार करणे, खडीकरण केलेले रस्ते डांबरी करणे, काही डांबरी रस्त्यांचे रुंदीकरण, रिसरफेसिंग आदी कामांचा समावेश होता. प्रत्यक्षात या कामांवर आर्थिक वर्षात ४७.४२ कोटी रुपयेच खर्च झाले. त्यात ७ कि.मी.चे खडीकरण, ५४ कि.मी.चे डांबरीकरण, १२ कि.मी.चे काँक्रिटीकरण झाले.  दोन वर्षांत महापालिकेने सिंहस्थात मिळालेल्या अनुदानासह रस्ते बांधणीवर तब्बल ७०० कोटी रुपये खर्ची घातले. मात्र, चालू वर्षी जून-जुलैच्या महिन्यातील पावसातच काही भागांत रस्त्यांची अवस्था बिकट बनलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या एकूणच कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. चालू आर्थिक वर्षात ३०० कोटींची तरतूददोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी रस्त्यांच्या कामांवर खर्च झाला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेत डी.पी. रस्ते विकसित करण्यासाठी पाच कोटींची स्वतंत्र तरतूद केली. मात्र, स्थायी समितीने सर्व ३१ प्रभागांतील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणासाठी ९४.९४ कोटी रुपयांची शिफारस केली. त्यात महासभेने तब्बल २०५.०५ कोटी रुपयांची भर घातली. त्यामुळे एकूण तरतूद ३०० कोटींवर गेली आहे. महापालिकेची एकूणच उत्पन्नाची जमा बाजू पाहता सत्ताधारी भाजपा एवढा निधी एकट्या रस्त्यांच्या कामांसाठी कसा आणि कुठून आणेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.