शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६८ टक्के !

By admin | Updated: February 21, 2017 23:40 IST

मतदान शांततेत : सर्वाधिक पेठ, तर सर्वात कमी नाशिकमध्ये

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सुमारे ६८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पेठ तालुक्यात ७६ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान नाशिक तालुक्यात ४२.०६ टक्के झाले. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. सकाळी मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह होता. मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिंडोरी तालुक्यातील वणीनजीक भातोडे गावात इव्हीएम यंत्रात तांत्रिक अडचणीने अनेकांना खोळंबून राहावे लागले. असाच प्रकार कळवण, त्र्यंबकेश्वर येथे घडल्याने मतदारांमध्ये संताप व्यक्त होत होता. निफाड तालुक्यातील ओझर येथेही मतदार याद्यांमधील घोळामुळे अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले. मालेगाव तालुक्यात किरकोळ वादाचे प्रकार घडले. या तालुक्यातही दुपार सत्रानंतरच मतदारांनी घराबाहेर पडणे पसंत केल्याने शेवटच्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी झाली होती.देवळा तालुक्यातील खामखेडा येथील मतदान केंद्रांवर लांबलचक रांग लागल्यामुळे चक्कर आल्याने एका महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.कसबे सुकेणे आणि मौजे सुकेणे येथील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. द्राक्ष हंगाम सुरू असल्याने या भागातील मतदान केंद्रांवर सकाळी मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. कसबे सुकेणे गट हा जिल्हा परिषदेसाठी आरक्षित असल्याने प्रचाराच्या सुरुवातीला काहीसा  निरुत्साह असला तरी मात्र शेवटच्या टप्प्यात निर्माण झालेल्या चुरशीमुळे प्रत्येक पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. त्यामुळे त्याभागातील मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाला आणि उत्साह वाढला. कसबे सुकेणे गटातील सर्व गावे ही द्राक्ष उत्पादक असल्याने या भागात द्राक्ष खुडही सुरू आहे. त्यामुळे मजूरवर्गाने मतदान करून कामावर जाणे पसंत केले म्हणून कसबे सुकेणे गटातील कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, साकोरे मिग, कोकणगाव, वडाळी, दीक्षी या भागात मतदानकेंद्रावर सकाळपासून गर्दी होती.(लोकमत ब्युरो)