शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

नांदगावी गटासाठी ५७ अर्ज

By admin | Updated: February 6, 2017 00:01 IST

मोठ्या प्रमाणात अनामत रक्कम जमा

नांदगाव : तालुक्यात रविवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्हा परिषद निवडणूक गटासाठी एकूण दहा तर गणासाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर आॅनलाइन प्रक्रि येत जिल्हा परिषदेच्या चार गटासाठी एकूण ५७ अर्ज तर तालुका पंचायत समितीच्या आठ गणासाठी ९४ अर्ज दाखल झालेत आजही मोठ्या प्रमाणात अनामत रकमा जमा झाल्या.दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षीत असताना अनेक उमेदवारांच्या पातळीवर राजकीय निर्णय होत नसल्याने मोजक्या संख्येने अर्ज दाखल झालेत. सोमवारी अंतिम दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी उसळेल असा कयास आहे. दरम्यान, रविवारी साकोरा गटातून शिवसेनेच्या वतीने सुभाष कुटे यांनी गट व गणात आपले अर्ज दाखल करताना खबरदारीचा उपाय म्हणून अपक्ष म्हणून देखील अर्ज भरला तर साकोरा गटातच राष्ट्रवादीच्या नम्रता पगार यांनीही गटगणात पक्षासोबत अपक्ष अर्ज दाखल केला या गटात दिलीप पगार व मल्हारवाडीचे सुखदेव खैरनार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला न्यायडोंगरी गटात आश्विनी आहेर यांनी काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल केला. भालुर गटातून मंदाताई सोनवणे व प्रतिभा लिहरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.जातेगाव गटासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. पंचायत समितीच्या वेहेळगाव गणासाठी रमेश पगार, सुभाष कुटे, रत्नाबाई मोरे, भानुदास पाटील यांनी तर साकोरा गणासाठी विमल खैरनार,सुरेखा पैठणकर ,सावरगाव गणासाठी भाग्यश्री मोरे, न्यायडोंगरी गणासाठी शंकुतला मोरे, पानेवाडी गणासाठी संजय शेरमाळे यांनी अर्ज दाखल केले. भालूर, मांडवड व जातेगाव गणासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. (वार्ताहर)