शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी

By admin | Updated: February 4, 2015 02:05 IST

नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी

नाशिक : महापालिका आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहे. ठेकेदारांची सुमारे ८५ कोटी रुपयांची देयके थकलेली आहेत. तरीही महासभेत ठरल्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, सदस्यांनी सबुरीने घेत अत्यावश्यक कामांवर भर द्यावा, असा सल्ला महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.नगरसेवक निधीवरून तापलेले राजकारण आणि सत्ताधारी मनसेतच वाढलेली धुसफुस या पार्श्वभूमीवर महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, प्रशासनाकडून ३० लाखांपर्यंतच्याच कामांना प्राधान्य देण्याचा आग्रह होता; परंतु महासभेने प्रशासनाला ५० लाखांची मर्यादा घालून दिली आहे. महापालिका कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. उत्पन्न असेल तर विकासकामांसाठी खर्च करण्याकरिता निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचे आणि घरपट्टी, पाणीपट्टीतील गळती शोधण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न आणि मिळकतींची एकूण संख्या पाहता त्यात मेळ बसत नाही. त्यासाठीच एका एजन्सीमार्फत शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याबाबत आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. आयुक्तांनीही ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. सदस्यांनीही अत्यावश्यक कामांवरच भर दिला पाहिजे. सध्या स्थायी समितीवर मंजूर झालेली विकासकामे करण्यावर भर राहणार असून, नगरसेवकांना ५० लाखांत नव्यानेही कामे सुचविता येणार आहेत. दरम्यान, मनसेत नगरसेवक निधीबाबत कोणतीही धुसफुस नसून कुणाच्या राजीनाम्याने महापालिकेला काही फरक पडणार आहे काय, असा टोलाही महापौरांनी गटनेत्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे लगावला.