शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जिल्ह्यात ५० कोटी रक्कम शिल्लक

By admin | Updated: January 8, 2017 01:11 IST

नोटबंदी : नवीन वर्षात बॅँका तंगीत

नाशिक : नवीन वर्षात रिझर्व्ह बॅँकेकडून नवीन चलनाचा पुरवठाच न झाल्याने जिल्ह्याच्या बॅँका आर्थिक तंगीत सापडल्या असून, ग्रामीण भागात स्टेट बॅँकेकडे फक्त ५० कोटी रुपये शिल्लक असल्याने व त्यात नोकरदारांच्या पगाराची वेळ आल्याने बाका प्रसंग उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीला साठ दिवस पूर्ण होत असताना अद्यापही आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकलेली नाही. सरकारने आठवड्याला २४ हजार रुपये बॅँकेतून काढता येतील, असे जाहीर केलेले असले तरी, बॅँका फक्त चार ते पाच हजार रुपयेच ग्राहकांच्या हातावर टेकवीत असून, बहुतांशी एटीएम पैसे शिल्लक नसल्याने बंदच आहेत. अशा आर्थिक परिस्थितीशी तोंड देत सरकारने सांगितलेले पन्नास दिवस नागरिकांनी कसेबसे काढले असले तरी त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. रिझर्व्ह बॅँकेकडून जिल्ह्यासाठी मागणीच्या तुलनेत अल्प चलन पुरवठा केला जात असून, नवीन वर्षात तर मोठी रक्कम प्राप्तच झालेली नाही. सध्या स्टेट बॅँकेच्या ग्रामीण शाखांमध्ये ५० कोटी रुपये शिल्लक आहेत, तर शहरातील सर्व पैसे संपल्याने स्टेट बॅँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यातच महिन्याची सात तारीख पगाराची असल्यामुळे शुक्रवारी स्टेट बॅँकेत पैशांचा खडखडाट झाल्याने ग्रामीण भागातून दहा कोटी रुपये तातडीने आणून व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी रिझर्व्ह बॅँकेकडून स्टेट बॅँकेला ५० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र सायंकाळपर्यंत पैसे प्राप्त झालेले नाहीत, रविवारी तशाही बॅँका बंदच राहणार असून, सोमवारी पगारदारांची पैसे काढण्यासाठी गर्दी होणार असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)