शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात १८ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ५ बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 00:40 IST

इगतपुरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. त्याकरीता इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात बालकांपासून १८ वर्षापर्यंतच्या मुलांकरीता ५ बेड आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देलहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.

इगतपुरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. त्याकरीता इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात बालकांपासून १८ वर्षापर्यंतच्या मुलांकरीता ५ बेड आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.तिसऱ्या लाटेपूर्वीच लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यात १ लाख ४७ हजार चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, आयसीयु मधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे.याच पार्श्वभूमीवर इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समितीने तालुक्यातील बालक ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण झाल्यास त्यावर त्वरित उपचार करण्यासाठी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नाही. त्यांना त्वरित उपचार मिळावे म्हणून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात ५ बेड राखीव ठेवावे अशा आशयाचे निवेदन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांना देण्यात आले. त्यांनी या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत येत्या २ ते ३ दिवसात मुलांसाठी ५ बेड आरक्षित करणार असल्याचे सांगितले.दरम्यान ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलटी होणे, भूक न लागणे, जेवण नीट न जेवणे, थकवा जाणवणे, शरीरावर पुरळ उठणे, श्वास घेताना अडचण जाणवणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्यावा असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.या वेळी श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, कृष्णा निकम, सुमित बोधक, निलेश खातळे, मंगला गायकवाड आदी उपस्थित होते.कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत चालली आहे. गेल्या वर्षी, जेथे बहुतेक मुले एसिम्प्टोमॅटिक होते, म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत. आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. अशी लक्षणे कोणा मुलांमध्ये आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.- डॉ. स्वरुपा देवरे, वैद्यकीय अधिक्षक, इगतपुरी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल