शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

्नराज्यातील ४५ उपासकांनी घेतली श्रामणेर दीक्षा

By admin | Updated: May 14, 2014 01:09 IST

त्रिरश्मी लेणी : बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध उप्रकम

त्रिरश्मी लेणी : बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध उप्रकम नाशिक : बुद्ध पौर्णिमेनिमित्त नालंदा एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्टच्या वतीने आयोजित सहा दिवसांच्या श्रामणेर दीक्षा शिबिरात राज्यभरातील ४५ उपासकांनी सहभागी होत धम्म समजावून घेतला, तसेच स्वत:पासून बौद्ध धर्माचे आचरण करण्याची शपथ घेतली़ पांडवलेणीच्या पायथ्याला असलेल्या बुद्धविहारात सुरू असलेल्या या श्रामणेर शिबिराचा बुद्ध पौर्णिमेला समारोप होत आहे़ बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे़ बुद्ध स्मारकात नालंदा एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रामणेर दीक्षा शिबिरात नाशिकसह परभणी, धुळे, हिंगोली, औरंगाबाद तसाच विविध ठिकाणच्या ४५ बाल व तरुण उपासकांनी सहभागी होत धम्माचा अभ्यास केला़ त्यांना भन्ते धम्मदीप यांच्या मार्गदर्शनाखाली भन्ते आर्यनाग, भन्ते धम्मकीर्ती, भन्ते राहुल, भन्ते प्रज्ञाधोन यांनी धार्मिक विधीची तसेच बौद्ध धर्माची माहिती देत दीक्षा दिली़ यावेळी सेवक भास्कर जोशी, रावसाहेब रगडे, उत्तम रसाळ, धम्म जाधव, प्रवीण राऊत आदिंनी सहभाग नोंदविला़ बुद्ध पौर्णिमेनिमित्त पांडवेलणी येथील बुद्ध स्मारकात बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये सकाळी ध्वजारोहण, ध्यान, मंगल मैत्री, बुद्धवंदना, परित्राण पाठ, दुपारी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर, भिक्खू महासंघाला महासंघदान, धम्म बांधवांना भोजनदान, भिक्खू संघाची धम्म देसना, सायंकाळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, कवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध पहाट कार्यक्रम सादर होणार आहे़ चौकट काय आहे श्रामणेर दीक्षा?भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पवित्र भिक्खू संघाची स्थापना केली होती. भगवान बुद्धांचा भिक्खू संघ म्हणजे शिस्तप्रिय समाज घडविणारा संघ. भिक्खू संघात प्रवेशासाठी कुटुंबीयांची परवानगी घेणे आवश्यक असते. केशवपन करून त्रिशरण, पंचशील ग्रहण केल्यानंतर आणि भिक्खू संघाच्या सर्व नियम, अटींचे पालन करणार्‍यांनाच भिक्खू संघात प्रवेश देण्यात येतो. पाच किंवा दहा दिवसांसाठीही श्रामणेर दीक्षा घेण्याची तरतूद बौद्ध धर्मात आहे. आयुष्याला चांगले वळण, आचरणात सुधार घडविण्यासाठी आणि बौद्ध धर्माविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी अनेकजण ही श्रामणेर दीक्षा घेतात. फ ोटो क्रमांक - 13पीएचएमए 65फ ोटो ओळी - पांडवलेणी पायथ्याजवळील बुद्ध स्मारकात श्रामणेर दीक्षेसाठी जाताना सहभागी उपासक.