शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST

शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वानुमते बारा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय ...

शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वानुमते बारा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत नाशिककरांना आवाहन करत लॉकडाऊन यशस्वी करण्याची साद घातली आहे. दरम्यान, अंशत: लॉकडाऊन काळात नियमांच्या अंमलबजावणीत असलेली शिथिलता आता दिसणार नसून, नियम आणि अंमलबजावणी कठोर करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोठेही कोणत्याही कारणास्तव नागरिकांची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्स धोक्यात येणार नाही, यासाठी चोख नियोजन करण्याचा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिला आहे. शहरात ४० नाकाबंदी पाइंटस्‌ लावण्यात आले आहेत. ही संख्या मोठी असून, नाकाबंदीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. यापूर्वी शहरात नाकाबंदी पॉइंटस्‌ होते. मात्र, येथे नागरिकांना अडविण्यात येत नव्हते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी चौकशी, कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात झाली. बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर मात्र कोणतीही सूट मिळणार नाही. नागरिकांना नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांवर चोख बंदोबस्त व नाकाबंदीची भिस्त पांडेय यांनी सोपविली आहे.