शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४; पोर्टलवर २९० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले ...

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यात पोर्टलवरील बळी अपडेट करण्याचे काम शुक्रवारीदेखील सुरूच होते. त्यात शुक्रवारी अपडेट केलेल्या २९० बळींमध्ये १७५ नाशिक मनपाच्या, तर नाशिक ग्रामीणच्या ११५ मृतांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात प्रत्यक्षात गेलेले चारही बळी हे नाशिक ग्रामीणचे आहेत. पोर्टलवरील या सर्व बळींमुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या तब्बल ७५२५ वर पोहोचली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचारार्थी रुग्णसंख्येत अजून घट आली असून ही संख्या ३१४१ पर्यंत खाली आली आहे. दरम्यान प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा एकदा हजारच्या खाली ८९० पर्यंत आली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ४५५, नाशिक मनपाचे १५८, तर मालेगाव मनपाच्या २७७ अहवालांचा समावेश आहे.

इन्फोे

कोरोनामुक्त ९७.२८ टक्के

जिल्ह्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणातही किंचितशी वाढ झाली आहे. शुक्रवारी हे प्रमाण सरासरी ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपा ९७.८६, नाशिक ग्रामीण ९६.४८, मालेगाव मनपा ९६.२४, तर जिल्हाबाह्य ९७.४५ इतके आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी पहिल्या लाटेनंतरदेखील ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा दुसरी लाट उसळल्याने अजूनदेखील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.