शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

३९ हजार मतदार वाढले

By admin | Updated: January 22, 2015 00:24 IST

अंतिम यादी जाहीर : केंद्रावर पाहण्यासाठी उपलब्ध

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात ३९ हजारांनी मतदारांमध्ये वाढ झाली असून, बुधवारी जिल्हा निवडणूक शाखेने विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. मतदारांना पाहण्यासाठी प्रत्येक केंद्रावर ही यादी ठेवण्यात येणार आहे. १ डिसेंबर २०१४ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर त्यावर दावे व हरकती मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणीही घेण्यात आली. दरम्यान, या मोहिमेत नवीन मतदारांची नोंद, स्थलांतरित, दुबार व मयत मतदारांची नाव वगळणी यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येऊन मतदार यादी अद्ययावत करण्यात आली. नवीन मतदारांची नोंदणी करताना त्यांची छायाचित्रेही जमा करण्यात आल्याने अंतिम मतदार यादी छायांकित झाली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार आता जिल्ह्णातील मतदारांची संख्या ४१ लाख ६८ हजार ६७९ इतकी झाली असून, यापुढे निरंतर नावनोंदणी प्रक्रिया विधानसभा मतदारसंघनिहाय सुरूच राहणार असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर महिनाभरात ३९ हजार ७६५ नवीन मतदारांची त्यात भर पडली आहे, तर ७८७२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नवीन मतदार यादी मतदारांना पाहण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात आली असून, प्रत्येक मतदार ती पाहून आपले नाव असल्याची खात्री तसेच त्यातील त्रुटींबाबत कार्यवाही करू शकणार आहे.