शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा संकुलासाठी ३५ कोटींचा फेरप्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST

सध्याच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेतच जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. प्रारंभी त्यासाठी विविध खेळांचा आंतर्भाव ...

सध्याच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेतच जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. प्रारंभी त्यासाठी विविध खेळांचा आंतर्भाव तसेच वाहनांच्या अंडरग्राउंड पार्किंगसह एकूण ६६ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, मोठ्या निधीला जिल्हा क्रीडा संकुल उभारणीअंतर्गत मान्यता मिळू शकणार नसल्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे त्या प्रस्तावातील काही भाग वगळून आता पुन्हा ३५ कोटींचा फेरप्रस्ताव पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यात शासनाच्या निर्धारित योजनेनुसार जिल्हा क्रीडा संकुलाला २४ कोटींच्या निधीला मान्यता मिळू शकणार आहे. तर उर्वरित ११ कोटींचा निधी हा जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने उपलब्ध व्हावा, असा प्रस्ताव त्यात देण्यात आला आहे. शासन नियमानुसार क्रीडा संकुलाच्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री, तर चेअरमन असतात. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्षदेखील पालकमंत्रीच असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतरच क्रीडा संकुलाचे पुढील काम मार्गी लागू शकणार आहे.

शासनाने काढलेल्या नवीन आदेशानुसार आता जिम्नॅशियम. योगा सेंटर, स्पोर्ट्स सेंटर, इनडोअर हॉलमधील सर्व खेळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच झुम्बा आणि ॲरोबिक्स यासारख्या इनडाेअर व्यायामाच्या प्रकारांनादेखील शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र, ते सुरू करण्याआधी शासनाच्या संबंधित वेबसाइटवर जाऊन कोरोनाविषयक सर्व नियमावलींचे पालन करण्याचे शपथपत्र भरून द्यावे लागणार आहे. तसेच इनडोअर खेळांना परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप सुब्रतोसह आउटडोअरच्या कोणत्याही स्पर्धेला परवानगी देण्यात आलेली नाही.

-रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी

फोट

१९नाईक रवींद्र