शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

३४ दुकानदारांचा सहभाग उघड

By admin | Updated: December 27, 2015 00:14 IST

रेशन धान्य घोटाळा : प्रमुख संशयित ठक्कर फरारच

नाशिक : राज्यातील बहुचर्चित वाडीवऱ्हे येथील रेशन धान्य घोटाळ्यात ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शनिवारी (दि़२६) न्यायालयात सांगितले़ या घोटाळ्यातील काळा पैसा दडविण्यासाठी तयार करण्यात आलेली आणखी एक कंपनी समोर आली असून, तिच्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही झाले आहेत़ दरम्यान, या घोटाळ्यातील तिघा संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली असून, उर्वरित चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़रेशन धान्य घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयात सांगितले की, या घोटाळ्यामध्ये ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे़ तसेच या धान्याची गुजरातमध्येही विक्री करण्यात आली असून, बनावट बिले व गाड्यांच्या नंबरप्लेट बदलून वाहतूक केल्याची कागदपत्रेही मिळाली आहेत़रेशन धान्य अपहारासाठी तयार करण्यात आलेली बनावट बिले कोणी तयार केली, नंबरप्लेट बदलून किती धान्याची वाहतूक झाली, त्यामधील सहभाग या तपासासाठी संशयितांच्या कोठडीची मागणी अ‍ॅड़मिसर यांनी केली़ पोलीस कोठडीच्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या गुदामांमधून धान्याची वाहतूक करण्यात आली तिच्याशी संबंधित काही सरकारी अधिकारी यामुळे उजेडात येणार आहेत़ तसेच पुढील काही दिवसांत या घोटाळ्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले़ सरकारी वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने संशयित अरुण घोरपडे, काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले या तिघांच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची (१ जानेवारीपर्यंत) वाढ केली, तर उर्वरित संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर यांना ११ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले़ दरम्यान, या घोटाळ्यातील प्रमुख संशयित जितेंद्र ठक्करपर्यंत पोलीस अद्यापही पोहोचू शकलेले नाहीत़ (प्रतिनिधी)