शहरात ट्रकमधून गांजा येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या विशेष पथकाने कुसुंबारोडवरील देवरे वस्तीजवळ नाकाबंदी केली होती. यावेळी ट्रक (क्रमांक एमएच ४१ जी ७१६५) याची तपासणी केली असता, यात ३१ किलो ७१४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या प्रकरणी पथकाने शेख अस्लम शेख उस्मान (४०) रा.नया आझादनगर, मालेगाव, अक्रमखान अब्बासखान (३६) रा. सुरत या दोघांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
------------------------------------------------------
वाखारी हत्याकांडप्रकरणी एकाला अटक
मालेगाव : जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या वाखारी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता ४ झाली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगार शिवाजी सद्गिर याला अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.