शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी राष्ट्र सेवा दलाची ३० वर्षांची परंपरा

By admin | Updated: August 13, 2014 00:41 IST

पूर्वसंध्येला साजरा होतो स्वातंत्र्यदिन

राजीव वडगे ल्ल मालेगावइंग्रजांची १५० वर्षांची जुलमी राजवट उलथवून भारत देश स्वातंत्र्य झाला. १४ आॅगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकविला. हा ऐतिहासिक क्षण सुवर्णअक्षरांनी कोरला. तेव्हापासून संपूर्ण भारत देशात १५ आॅगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देशात सकाळी ध्वजारोहण आदि कार्यक्रमाने स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. मात्र याला अपवाद ठरले ते मालेगावचे राष्ट्र सेवा दल.‘सदैव सैनिका पुढेच यायचे’ हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असणारे सेवा दल सैनिक मात्र १४ आॅगस्टच्या मध्यरात्री तिरंगा फडकावून स्वातंत्र्य दिनाचे स्वागत करतात. ही परंपरा गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून येथे सुरू आहे, हे विशेष. स्वातंत्र्यसैनिक ओंकारआप्पा लिंगायत, दत्ता वडगे, डॉ. सुगन बरंठ, हरिष पाठक, सुनील राणे, किशोर जाधव, भास्कर तिवारी, संजय जोशी, सुधीर साळुंके, गोकुळ वाणी, उषा मंजिरे, नचिकेत कोळपकर, डॉ. बहार देवरे आदिंचे प्रयत्नातून हा उपक्रम सुरू झाला आहे. माजी गृहमंत्री भाई वैद्य, सेवा दलाचे महामंत्री कै. बा.य. परीट गुरुजी, प्रा. अरविंद कपोले, विद्यमान महामंत्री माधव गुरव, अ‍ॅड. दिलावर खान, यदुनाथ थत्ते, माजी शिक्षक आमदार जे.यू. ठाकरे, शाहीर लीलाधर हेगडे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, अर्जुन कोकाटे, बृहस्पती शर्मा (मध्य प्रदेश) आदि मान्यवरांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे. सेवा दलाच्या घोषणा देत मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांनी मान्यवर अतिथींच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकविला जातो. राष्ट्रगीताने स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. तोही १९८३ पासून दरवर्षी अखंडपणे. याहीवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. यावर्षीचे मान्यवर अतिथींच्या हस्ते साने गुरुजी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार ही प्रथमच प्रदानही करण्यात येणार आहे.