शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात ३० प्रवासी जखमी

By admin | Updated: October 8, 2016 00:49 IST

दुर्घटना : सप्तशृंगगड ते नांदुरीदरम्यान दोन बसेसची जोरदार धडक

वणी : सप्तशृंगगडावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला मागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३० भाविक जखमी झाले. जखमी भाविक औरंगाबाद जिल्ह्यातील व सिन्नर येथील आहेत. शुक्र वारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सप्तशृंगगड ते नांदुरी रस्त्यावर हा अपघात झाला.एमएच १४ बीटी-३५९३ ही मालेगाव आगाराची बस भाविकांना घेऊन गडावरून नांदुरी येथे येत असताना नांदुरीपासुन दोन किलोमीटर अंतरावर एक मृत म्हैस रस्त्यावर पडली होती. पहाटेच्या वेळी दाट धुके असल्यामुळे वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. जवळ गेल्यावर हेडलाईटच्या प्रकाशात चालकाने म्हैस बघितली. अपघात होऊ नये म्हणून ब्रेक दाबले. मात्र त्याच सुमारास कळवण आगाराची दुसरी बस मागाहून आली व चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पुढील बसवर धडकली. सुदैवाने या दोन्ही बस रस्त्यावरच अडकल्या अन्यथा खोलगट आकाराच्या दरीसद्दश भागात रस्त्यापलीकडे गेल्या असत्या तर अनर्थ ओढवला असता.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. कारण शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गडावर २४ तास मंदिर खुले असल्याने दर्शनार्थींसाठी बसच्या फेऱ्या सुरू आहेत. ४५ मिनिटांनी वाहतूक पूर्ववत झाली. तोपर्यंत काही जखमींना न्यासाच्या व काही जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सप्तशृंगगड व वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले. जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५०० रुपये सहायक वाहतूक अधीक्षक बी. एम. राठोड व वाहतूक निरीक्षक सुरेश पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. (वार्ताहर)