शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात रेमडेसिविरचे ३० इंजेक्शन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:15 IST

पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत महिनाभरात ...

पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत महिनाभरात तब्बल १० संशयित आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून जवळपास ३० इंजेक्शन जप्त केले आहे. पंचवटी परिसरातील जुना आडगाव नाका या ठिकाणी एका रुग्णालयात रुग्णाला एक इंजेक्शन ३० हजार रुपये किमतीला विक्री करताना खुद्द एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी तीन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले होते. त्यानंतर मखमलाबादला एका वॉर्डबॉयकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल पाच

रेमडेसिविर जप्त केले होते. गेल्या आठवड्यात आडगाव पोलिसांनी आडगाव शिवारात असलेल्या के. केे. वाघ महाविद्यालयासमोर ५४ हजार रुपयांत दोन रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करताना तीन नर्स व मेडिकल दुकानात काम करणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. या काळ्याबाजाराचे मुख्य केंद्र पंचवटी असले तरी, पालघर जिल्ह्यातून त्याचा पुरवठा केला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

चौकट===

पंचवटीत सातत्याने घडत असलेल्या या घटनांच्या मुळाशी जात चौकशी केली असता, पंचवटी भागात सर्वाधिक रुग्णालये व वैद्यकीय संस्था असून, अशा संस्थांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, वॉर्डबॉय हे होस्टेलमध्ये पंचवटीत वास्तव्यात आहेत. शहरातील अन्य रुग्णालयांमध्ये काम करणारे वॉर्डबॉय, परिचारिका देखील पंचवटीतच आश्रयास आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला इंजेक्शन दिले किंवा नाही याची रुग्णालय व्यवस्थापनाकडून पुरेशी खात्री केली जात नाही, त्यामुळे परिचारिका, वॉर्डबॉयचे फावते, असे आजवर पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.