शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाकडे ३ कोटी ८२ लाखांचा ‘गल्ला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : कोरोना संकटामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर केले. ...

नाशिक : कोरोना संकटामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर केले. त्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. परंतु, अद्याप शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत केलेले नाही. त्यामुळे शिक्षण मंडळ परीक्षा शुल्क कधी परत करणार, असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जातो आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना संसर्गाचा धोका उद्धभवू नये यासाठी शासनाच्या सूचनेनुसार राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करून निकाल जाहीर केले. त्यामुळे यंदा लेखी परीक्षा झाली नाही. पर्यायाने पर्यवेक्षकांना मानधन, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त साहित्य, भरारी पथकांचा खर्च, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचा मुद्रणखर्च असा खर्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला आला नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांकडून जमा केलेले परीक्षा शुल्क शिक्षण मंडळ कधी परत करणार, असा प्रश्न पालक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्याने त्यासाठी खर्चही होणार नसल्याने, आता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्कही शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी नाशिकमधील पालकांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९२ हजार २३६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्याकडून राज्य शिक्षण मंडळाने ४१५ रुपये परीक्षा शुल्क घेतले असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला ३९५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले होते. याप्रमाणे, मंडळाकडे जवळपास ३ कोटी ८२ लाख ७७ हजार ९४० रुपये शुल्क यंदा जमा झाल्याचा अंदाज असून ही रक्कम मंडळाने विद्यार्थ्यांना परत करण्याची मागणी होत आहे.

---दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर तसे निर्देश विभागीय मंडळाला प्राप्त होतील. त्यानुसार, विभागीय मंडळ अंमलबजावणी करेल. याबाबत विभागीय मंडळाकडे अधिकार नाही.

- के.बी. पाटील, अध्यक्ष, विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक.

---

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा- १,०९० प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५

दहावीतील एकूण विद्यार्थी - ९२,२३६ परीक्षा शुल्काची एकूण रक्कम -३,८२,७७,९४०