शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला २९१ उमेदवारांचे अर्ज वैध

By admin | Updated: February 5, 2017 00:55 IST

१० अर्ज अवैध : एकाच प्रभागात १७ अर्ज बाद

नाशिकरोड : मनपा निवडणुकीत नाशिकरोडच्या सहाही प्रभागाच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत विविध कारणांमुळे १० अर्ज अवैध तर एकाच प्रभागात दोन गटात दाखल केलेल्यांपैकी १७ अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे २९१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे मनसेच्या प्रभाग १८ ब मधील उमेदवार सुलोचना बोराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज रद्द करून क गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला आहे.  नाशिकरोडच्या सहाही प्रभागात एकूण ३१८ इच्छुकांनी ५०३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मनपा विभागीय कार्यालयात शनिवारी सकाळी ११ वाजता प्रभाग १७, १८, १९ मधील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी डी.एच. हौसारे व प्रभाग २०, २१, २२ मधील छाननी निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्बळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रत्येक प्रभागातील एका गटाची उमेदवारी अर्ज छाननी स्वतंत्रपणे घेण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी भेट देऊन पाहणी केली. २७ उमेदवारी अर्ज बादउमेदवारी अर्ज छाननीमध्ये प्रभाग १७ ड - अमोल अविनाश जगताप (दुसऱ्या प्रभागातील अनुमोदक, सुचक) प्रभाग १९ अ - प्रकाश बाबुराव चंदनसे (प्रतिज्ञापत्र व सही नाही), प्रभाग १९ ब - अनुराधा विनोद गारूडे (मतदार यादीत नाव नाही), प्रभाग २० अ - प्रशांत चंद्रकांत गांगुर्डे (अर्जावर सही नाही), संतोष देवराम शेळके (कागदपत्रे अपुर्ण), अरुण प्रेमनाथ आहेर (सही व अनामत रक्कम पावती नाही), प्रभाग २० क - मंगल सुनील आडके (तिसरा अपत्य कॉलम रिकामा सोडला), प्रभाग २१ ब - युसूफ रंगरेज (जात पडताळणी प्रमाणपत्र नाही), प्रभाग २२ अ- संजय सोमनाथ लासुरे (कागदपत्रे अपुर्ण), प्रभाग २२ ड - शेख फिदा मोहम्मद इसार (अनुमोदक दुसऱ्या प्रभागातील) म्हणून हे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर एकाच प्रभागातील दोन गटात उमेदवारी अर्ज दाखल केले असून संबंधित उमेदवाराने सांगितल्याप्रमाणे एक गटातील उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. पुढीलप्रमाणे - प्रभाग १७ ब - भारती रमेश पगार, ड - गणेश सुकदेव गांगुर्डे, प्रभाग १८ अ - विलासराज मोहन गायकवाड, रोहिणी संतोष पिल्ले, ब - केतकी सुरेश बोराडे, मनसेच्या उमेदवार - सुलोचना नंदकिशोर बोराडे, क- लता बाळासाहेब ढिकले, प्रभाग १९ अ - किरण शामराव बोराडे, ब - भारती अंबादास ताजनपुरे, प्रभाग २० क - मंगलाबाई संपत लवटे, ड - उदय फकिरा भालेराव, संजय बाबुराव अढांगळे, प्रभाग २१ ड- रमेश शंकर धोंगडे, प्रभाग २२ ब - गौरी शंकर साडे, सुनीता उत्तम कोठुळे, जयश्री संजय कोठुळे, प्रणाल विक्रम कोठुळे या १७ जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. त्यामुळे २९१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. प्रभाग २० ड मधील भाजपाचे उमेदवार संभाजी मोरूस्कर यांच्या गटाची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मोरूस्कर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा म्हणून तीन लेखी हरकती घेण्यात आल्या आहेत. छाननी प्रक्रिया प्रसंगी उमेदवार, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.आर. ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.