शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

2500 एलईडी बसविणार

By admin | Updated: March 25, 2017 22:45 IST

सिन्नर : ऊर्जेची व वीजबिलांची बचत होण्याच्या दृष्टीने शहरात सुमारे अडीच हजार एलईडी बल्ब बीओटी तत्त्वावर बसविण्याचा निर्णय सिन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

सिन्नर : ऊर्जेची व वीजबिलांची बचत होण्याच्या दृष्टीने शहरात सुमारे अडीच हजार एलईडी बल्ब बीओटी तत्त्वावर बसविण्याचा निर्णय सिन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.  नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. ऊर्जेची व वीज बिलाची बचत होण्याच्या दृष्टीने एलईडी बल्ब बसविणे गरजेचे असल्याचे सर्वांनी मान्य केले. एलईडी बल्ब बसविल्याने दरमहा दीड लाख रुपये वीज बिलांची बचत होण्याचा अंदाज आहे. आगामी तीन वर्षे त्याचा फायदा होईल.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून १४ व्या वित्त आयोगातून १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तथापि, शहरातील भौगोलिक परिस्थितीमुळे तळवाडी, गोंदेश्वर, भंडारवाडी येथे खडकाळ जमीन असल्याने सदर निधीतून ते काम शक्य नसल्याने या भागात वैयक्तिक शौचालय बांधण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेच्या निधीतून ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे शंभर ते दीडशे कुटुंबियांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. त्यास पालिकेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालिकेतर्फे आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीचे बील दर सहा महिन्यातून एकदा पाठविण्यात येते. तथापि, प्रशासकीय सोयीसाठी व वसुलीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी पाणीपट्टीचे बील वर्षातून एकदा एक हजार दोनशे रुपये याप्रमाणे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेसाठी पाण्याचा टॅँकर खरेदी करणे, स्वच्छता कर, घनकचरा व्यवस्थापन कर, मैला व्यवस्थापन कर यांची पुनर्रचना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा करण्यात येवून त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीस उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक विजय जाधव, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, शैलेश नाईक, बाळासाहेब उगले, गोविंद लोखंडे, रुपेश मुठे, श्रीकांत जाधव, नामदेव लोंढे, सुहास गोजरे, चित्रा लोंढे, सुजाता तेलंग, प्रतिभा नरोटे, सुजाता भगत, नलिनी गाढे, प्रणाली गोळेसर, ज्योती वामने, अलका बोडके, मल्लू पाबळे, संतोष शिंदे, मंगला शिंदे, गीता वरंदळ, मालती भोळे, निरुपमा शिंदे, प्रिती वायचळे, शीतल कानडी, विजया बर्डे, वासंती देशमुख, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास उपस्थित होते. (वार्ताहर)