शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

प्रतिचौकसभेसाठी भरा २५० रुपये!

By admin | Updated: January 18, 2017 23:33 IST

दरपत्रक जाहीर : गोल्फ क्लब मैदानासाठी २९ हजार रुपये दर

नाशिक : चौकसभा घ्यायचीय, भरा २५० रुपये; गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा घ्यायचीय, भरा २९ हजार रुपये; बूथ लावायचाय, भरा ९०० रुपये... हे दरपत्रक महापालिका प्रशासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेच्याही खजिन्यात चार पैसे पडणार  आहेत.  शहरात नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार साहित्य ठिकठिकाणी लावले जाणार आहे. मात्र, सदर प्रचार साहित्य अथवा चौकसभा, जाहीर सभांसाठी संबंधिताना शुल्क आकारणी केली जाणार असून, त्याचे दरपत्रक महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार, प्रतिचौकसभेसाठी २५० रुपये, कापडी बॅनर्ससाठी प्रतिनग २०० रुपये, जाहिरात फलकासाठी प्रतिनग ३०० रुपये, झेंड्यासाठी प्रतिनग १० रुपये, सभेच्या ठिकाणी पोस्टर्स व झेंडे लावण्यासाठी प्रतिनग १० रुपये, खासगी जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी प्रतिनग ३०० रुपये, प्रचार वाहनासाठी प्रतिवाहन २५० रुपये, वाहनावरून प्रचार करण्यासाठी प्रतिबॅनर्स २५० रुपये, दहा बाय दहा चौ. फूट जागेत बूथ लावण्यासाठी प्रतिबूथ ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.  निवडणुकीच्या प्रचार काळात नेत्यांच्या जाहीर सभाही होतील. व्हीआयपी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टरचा वापर होण्याची शक्यता आहे.  गोल्फ क्लब मैदान व सिडकोतील राजे संभाजी स्टेडिअमवर हेलिपॅड उभारण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.  त्यासाठी एक दिवसाकरिता सेवाकर व्यतिरिक्त ७०० रुपये शुल्क असेल. राजकीय पक्षांना मैदाने समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे.