शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अडीचशे मतदान केंद्रे संवेदनशील

By admin | Updated: February 17, 2017 21:50 IST

सुरगाण्यात १३, तर निफाडला दोन अतिसंवदेनशील केंद्रांचा समावेश

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला २६५३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, जिल्ह्यात २५३ मतदान केंद्रे संवेदनशील, तर त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९४ मतदान केंद्रे संवदेनशील असल्याने तेथे जास्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील गत निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊनच पोलीस विभागाने संवदेनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची यादीच तयार केली आहे. या यादीनुसार मतदानाच्या दिवशी या केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, तेथील पोलिसांची गस्तही वाढविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या यादीत १५ मतदान केंद्रे ही अतिसंवेदनशील ठरविण्यात आली असून, त्यात सुरगाणा तालुक्यातील १३ व निफाड तालुक्यातील दोन अतिसंवदेनशील केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यात एका केंद्रांच्या १० टक्के मतदान केंद्रे ही आदर्श करावीत, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने पंधरा तालुक्यांतील ३०० मतदान केंद्रे ही आदर्शवत तयार केली आहेत. या मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, दिव्यांग नागरिकांसाठी रॅम, निवारा शेड, तसेच इतर सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका शांततेत तसेच पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने निवडणुकांसाठी तयारी केली आहे. मागील महिन्यात प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी देत सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली होती. मालेगाव येथील नुकत्याच झालेल्या गोरक्षा समिती पदाधिकारी मारहाणच्या घटनेनंतर मालेगावमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.