शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अडीचशे मतदान केंद्रे संवेदनशील

By admin | Updated: February 18, 2017 00:19 IST

सुरगाण्यात १३, तर निफाडला दोन अतिसंवदेनशील केंद्रांचा समावेश

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला २६५३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, जिल्ह्णात २५३ मतदान केंद्रे संवेदनशील, तर त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९४ मतदान केंद्रे संवदेनशील असल्याने तेथे जास्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.जिल्ह्णातील गत निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊनच पोलीस विभागाने संवदेनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची यादीच तयार केली आहे. या यादीनुसार मतदानाच्या दिवशी या केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, तेथील पोलिसांची गस्तही वाढविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या यादीत १५ मतदान केंद्रे ही अतिसंवेदनशील ठरविण्यात आली असून, त्यात सुरगाणा तालुक्यातील १३ व निफाड तालुक्यातील दोन अतिसंवदेनशील केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यात एका केंद्रांच्या १० टक्के मतदान केंद्रे ही आदर्श करावीत, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने पंधरा तालुक्यांतील ३०० मतदान केंद्रे ही आदर्शवत तयार केली आहेत. या मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, दिव्यांग नागरिकांसाठी रॅम, निवारा शेड, तसेच इतर सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका शांततेत तसेच पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने निवडणुकांसाठी तयारी केली आहे. मागील महिन्यात प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी देत सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केली होती. मालेगाव येथील नुकत्याच झालेल्या गोरक्षा समिती पदाधिकारी मारहाणच्या घटनेनंतर मालेगावमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)