शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी सेवेत २५ हजार बोगस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 23:56 IST

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग बैठक : राज्यातील आश्रमशाळांच्या समस्यांवर नाराजी

 नाशिक : महाराष्ट्रात जवळपास केंद्र व राज्य सरकार अशा दोन्ही सेवेत मिळून सुमारे २५ हजार कर्मचारी व अधिकारी बोगस प्रमाणपत्र देऊन कार्यरत आहेत. कदाचित देशात ही संख्या अव्वल क्रमांकाची असू शकते, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर ओरॉन यांनी व्यक्त करीत संबंधित बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाईची शिफारस राज्य सरकारकडे करणार असल्याचे सांगितले.ना धड खेळाच्या सुविधा, ना भाषेबाबत स्वतंत्र ज्ञान, घरी असलेली जमीनच आश्रमशाळेत झोपण्यासाठी मिळत असेल तर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य कधी उज्ज्वल होणार? या शब्दात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या समितीने सोमवारी आदिवासी विकास विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने राज्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. (पान ७ वर)बैठकीनंतर बोलताना राष्ट्रीय अनुसूचित जमातीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर ओरॉन यांनी पत्रकारांना सांगितले की, बोगस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त करून मूळ आदिवासी कर्मचारी-अधिकाऱ्यांना त्या जागेवर सेवेत घेण्याबाबत सूचना देण्यात येतील. मात्र बोगस प्रमाणपत्र देणारे व घेणाऱ्यांवर यापुढे कायदेशीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आयोगातर्फे राज्य सरकारला देण्यात येतील.विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा नसल्याचे त्यांच्या आढाव्यातून आढळून आल्याचे कळते. विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत दर्जेदार भोजन मिळत नाही. जमिनीवरच झोपावे लागते. वेळेत शैक्षणिक साहित्य मिळत नाही. विज्ञान आणि भाषेचे शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. खेळाच्या फारशा सुविधा नाहीत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होणार असा प्रश्न समितीने बैठकीत उपस्थित करून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचे समजते. आदिवासी विद्यार्थी सरासरी दहावीपर्यंतच शिकतात व पुढे त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला सुरुवात करतात. त्यामुळे ते भारत कधी पाहणार, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना भारतभर फिरून देशाची माहिती होण्यासाठी शैक्षणिक सहली काढण्याच्या सूचना समितीने आदिवासी विभागाला दिल्याचे कळते. तसेच पावसाळा गेल्यावर रेनकोट खरेदी आणि हिवाळा गेल्यावर स्वेटरची खरेदी, या विरोधाभास कामकाजाबाबत समितीने नाराजी व्यक्त केल्याचे कळते. तसेच आवश्यक त्या कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार शिवराम झोले, आदिवासी विकास आयुक्त सोनाली पोंक्षे, तसेच समितीचे सर्व सदस्य आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)