शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

भाजपाच्या २४ बंडखोरांची हकालपट्टी

By admin | Updated: February 18, 2017 00:12 IST

शिस्तभंग : सहा वर्षांसाठी निलंबित

नाशिक : महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या २४ पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.  भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी या संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. भाजपाच्या बंडखोरांनी १९ प्रभागात पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक रिंगणात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका निर्माण झालेला असताना पक्षाकडून या बंडखोरांच्या बाबतीत कोणताच निर्णय होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने जवळपास सर्वच मूळ भाजपाचेच सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. अनेक वर्षे पक्षात काम केल्यावरही महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नाही, उलट ऐनवेळी पक्षात आलेल्यांना मानाचे पान देण्यात आल्याची खंत व्यक्त करीत त्यांनी बंडखोरी केली होती. अर्थातच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या बंडखोरांनी पक्ष नेत्यांवर आर्थिक देव-घेवीचे आरोप केले त्याचबरोबर पक्षाने अन्याय केल्याची भावनाही व्यक्त केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर बंडखोरांची कृती पक्ष विरोधी कारवाया ठरविण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करून त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे सानप यांनी पत्रकात म्हटले आहे.  निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान नगरसेवक, शहर सरचिटणीस, शहर चिटणीस, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष, व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख, आदिवासी आघाडीचे शहराध्यक्षांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)हकालपट्टी झालेले बंडखोरश्रीमती मंदाबाई बबन ढिकले (प्रभाग १८), सुरेश अण्णाजी पाटील (१२), प्रकाश दीक्षित (१२), दीपाली मिलिंद भूमकर (१३), मिलिंद भूमकर (१३), डॉ. वैशाली काळे (१४), मधुकर हिंगमिरे (७), संदीप मंडलेचा, सोनल मंडलेचा (२९), जयश्री पद्माकर घोडके, चारुहास पद्माकर घोडके, लता संजय करिपुरे, संजय करिपुरे (२३), समीर पद्माकर गायधनी (१३), रुक्मिणी धोंडीराम कर्डक (४), दीपक शेवाळे, विनायक बाळासाहेब बर्वे (९), श्रीमती अलका रामचंद्र गांगुर्डे (१४), सविता गायकवाड (१६), मीरा गोसावी (१७), विकास पगारे (२०), सरला महेंद्र अहिरे (२१), राजेंद्र मंडलिक (२२) यांचा समावेश आहे.