शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलात २४ लाखांचा अपहार

By admin | Updated: February 6, 2017 00:34 IST

पोलीस आयुक्तालय : हवालदारावर गुन्हा; दोन दिवसांची कोठडी

नाशिक : शहर पोलीस मुख्यालयातील गैरव्यवहाराचे एकेक प्रकरण बाहेर येत असून, मुख्यालयातील एका पोलीस हवालदाराने पोलीस आयुक्तालयाच्या विविध आस्थापना विभागांचे वीज भरण्यामध्ये २४ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ संशयित पोलीस हवालदाराचे नाव हिंमत रघुनाथ निकम (रा़ पोलीस मुख्यालय) असे असून, त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़  सरकारवाडा पोलीस ठाण्यात मुख्य लिपिक कृष्णा काशीनाथ अहिरे (रा. शिवाजीनगर, दिंडोरीरोड, म्हसरूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस आयुक्तालयांतर्गत अनेक आस्थापना विभाग आहेत़ या आस्थापना विभागांना येणारे विजेचे बिल वीज वितरण कार्यालयात भरण्याचे काम पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार हिंमत निकम यांच्याकडे होते़ संशयित निकम याने ९ मार्च २०१४ ते २ सप्टेंबर २०१५ तसेच जून २०१६ या कालावधीत वीज बिल भरण्याचे काम केले़ पोलीस आयुक्तालयातील विविध आस्थापना विभागास येणाऱ्या मासिक वीज बिलामध्ये संशयित निकम याने अफरातफर तसेच बिलभरणा पावत्यांमध्ये खाडाखोड केली़  वीज कंपनीने पाठविलेल्या बिलातील रकमेपैकी कमी रकमेचा भरणा करून मिळणाऱ्या पावत्यांवर संपूर्ण बिलाची रक्कम दाखवली, त्यासाठी पावत्यांवर खाडाखोड करून भरणा केल्याचे दाखविले़ (प्रतिनिधी)