शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

२४ लाख टन कांद्याची विक्रमी निर्यात

By admin | Updated: March 24, 2017 23:04 IST

लासलगाव यावर्षी कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आवकही चांगली झाली आहे. परिणामी निर्यातही विक्रमी होत आहे. हंगामामध्ये कांदा निर्यातीमध्ये नऊ महिन्यात २४ लाख टन कांदा निर्यात झाला.

शेखर देसाई : लासलगावयावर्षी कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आवकही चांगली झाली आहे. परिणामी निर्यातही विक्रमी होत आहे. हंगामामध्ये कांदा निर्यातीमध्ये नऊ महिन्यात २४ लाख टन कांदा निर्यात झाला. कांदा निर्यातीने २००९-१० झालेल्या १८.७३ लाख टन निर्यातीचा विक्रम या २०१६-१७ मध्ये पार केला.  देशात आजपर्यंत झालेल्या कांदा निर्यातीचा हा उच्चांक आहे. कांद्यावरील किमान निर्यातमूल्य दर हे शून्य केल्याने निर्यातीत वाढ झालेली आहे. देशातून झालेली २४ लाख टन कांदा निर्यात ही एप्रिल ते डिसेंबर या महिन्यातील आहे. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत कांदा निर्यात ही ३० लाख टन होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे कांदा निर्यात जरी भरघोस वाढलेली असली तरी कांद्याचे उत्पादन यावर्षी मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होत आहे. त्यामुळे कांद्याला चारशे ते पाचशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकाला कांदा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने त्यांच्यावरची आर्थिक चिंता कायम आहे. कांदा म्हटले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याची चर्चा असते. कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यामुळे उत्पादकाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यंदा निसर्गाने शेतीला चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली.