शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशकात २४ किलो गांजा जप्त

By admin | Updated: July 29, 2016 00:35 IST

दीड लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांचे धाडसत्र

नाशिक : जुने नाशिक परिसरात भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी (दि.२८) छापेमारी करत सुमारे एक लाख ४७ हजार रुपये किमतीचा साडेचोवीस किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. पोलीसांनी शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारांविरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत सदर कारवाई केली. जुने नाशिकसह भद्रकाली भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी येत असल्याची चर्चा होती. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून गुन्हे शोध पथकासह तांबे यांनी खडकाळी येथील जीन मंजीलजवळील टपरीवर धाड टाकली. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांनीही तत्काळ सापळा रचला. पोलीस कुमक वाढविण्याचे आदेश देत भद्रकाली हद्दीतील जुने नाशिक भागात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. संशयित हनीफ वजीर शेख, वसीम वजीर शेख या दोघा भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजार रुपये किमतीचा एक किलो गांजा मिळून आला. यांची चौकशी केली असता हा गांजा काजीपुरा भागात राहणाऱ्या वसीम अनीस शेख व शब्बीर रमजान हुसेन यांच्याकडून काही वेळेपूर्वीच विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे शिवनेरी चौकात जाकीर हुसेन रुग्णालयाच्या शेजारी पोलीस पथकाने धाड टाकली. यावेळी वसीम व शब्बीर यांच्याकडून अठरा हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून काझीपुऱ्यातील गौरव अ‍ॅनेक्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहसीन अनिस शेख उर्फ मिन्या याच्या घरावरही पोलिसांनी छापा मारला. सदनिका क्रमांक दोनची पोलिसांनी झडती घेतली असता बाल्कनीमध्ये ९६ हजार रुपये किमतीचा सोळा किलो गांजा तसेच वरील सदनिकेच्या झडतीमध्ये बेडरुममधून पलंगाखालून चार साडेचार किलो असा एकूण वीस किलो पाचशे ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. या सर्व संशयितांकडून एकूण एक लाख ४७ हजार रुपये किमतीचा एकू ण २४ किलो ५०० ग्रॅम इतका गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. (प्रतिनिधी)