शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रबोधिनीत २४ तास ‘तिरंगा’

By admin | Updated: August 17, 2015 00:25 IST

देशप्रेमाचे स्फुलिंग : २० बाय ३० फुटांचा राष्ट्रध्वज

नाशिक : पोलीस अधिकारी घडविणाऱ्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीची (एमपीए) ओळख आता आणखी एका गोष्टीसाठी होणार आहे़ ती म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत पेटविणारा सर्वांत मोठा आणि उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) या ठिकाणी १५ आॅगस्टपासून अभिमानाने फडकतो आहे़ प्रबोधिनीच्या तीन नंबरच्या गेटजवळ तयार करण्यात आलेल्या स्तंभावर चोवीस तास हा तिरंगा फडकताना दिसणार आहे़ नवी मुंबईनंतर नाशिकमध्ये इतका मोठा राष्ट्रध्वज असल्याचे सांगितले जाते आहे़भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील अधिकारी नवल बजाज व हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून याची निर्मिती करण्यात आली असून, त्यास मुंबईतील जिंदाल फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे़ २० फूट बाय ३० फूट आकार असलेला हा तिरंगा तब्बल साडेआठ किलो वजनाचा आहे़ यासाठी १०० फूट उंचीचा ध्वजस्तंभ तयार करण्यात आला आहे़ रात्रीच्या वेळी ध्वजावर प्रकाश रहावा यासाठी चार हॅलोजन लावण्यात आले असून, विद्युत पुरवठा खंडित झाला तरी बॅकअपवर हॅलोजन सुरू राहणार आहेत़राष्ट्रध्वजासाठी स्वतंत्र मैदान तयार करण्यात आले असून, त्र्यंबकेश्वर रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला तो दिसावा यासाठी जाळी लावण्यात येणार आहे़ राष्ट्रध्वज संहितेतील नियमांचे पालन करून हा तयार करण्यात आला आहे़ सहा महिन्यांनंतर वास्तुविशारद धनंजय शिंदे यांच्या संकल्पनेतून भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती केली जाणार आहे़ नॉर्थ इंडिया, नवी मुंबई, बंगळुरू, जयपूर, दिल्ली (कॅनॉट प्लेस) या ठिकाणी सर्वांत उंच राष्ट्रध्वज आहेत़ पोलीस प्रबोधिनीत झालेल्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाप्रसंगी अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)