शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

चैत्रोत्सवात देवीचे २४ तास दर्शन

By admin | Updated: March 24, 2017 20:44 IST

सप्तशृंगगड : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी विविध विभागांची तयारी पूर्णत्वाला आली असून, मंदिर २४ तास खुले ठेवून खास व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सप्तशृंगगड : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी विविध विभागांची तयारी पूर्णत्वाला आली असून, यात्रोत्सव कालावधीत भाविकांची सोय व्हावी यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवून खास व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, तहसीलदार कैलास चावडे, सप्तशृंगगड ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात झाली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले.सप्तशृंगगड ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोधर बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, १३ ते १४ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील, असा अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. दर्शनाच्या वेळी तसेच पहिल्या पायरीपासून ते मंदिर गाभाऱ्यापर्यंत भाविकांवर व परिसरात सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.यात्रा कालावधीत नांदुरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रोत्सव कालावधीत सप्तशृंगगडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तर गावातील वाहनांना पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी ८० कंत्राटी कामगारांची नेमणूक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये टीसीएल टाकून जल शुद्धीकरण करण्यात येणार आहे.तात्पुरते स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे. गावातील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. चैत्रोत्सवादरम्यान नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण व आरोग्य विभागाच्या वतीने सप्तशृंगगड, नांदुरी येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, परिचर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार आहे तसेच रुग्णांसाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव यात्रा कालावधीत ट्रस्टतर्फे भगवती मंदिर, सभामंडप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, मोफत महाप्रसाद तसेच परिसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी संरपच सुमनबाई सूर्यवंशी, माजी सरपंच संदीप बेनके , ग्रामस्थ व्यापारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)