सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे गुरुवारी २३ तर अडसरे बुद्रुक येथे १५ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने घळबळ उडाली असून नागरीकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सरपंच तारा बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी व अडसरे बुद्रुकचे सरपंच संतू साबळे यांनी केले आहे.मागील आठवड्या पासून सर्वतीर्थ टाकेद येथे खेड प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत ॲटिजन टेस्टद्वारे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुप्ता यांचे मार्गदर्शना खाली डॉ. दिपक घोरपडे, आरोग्य सेवक अमोल पाटील, तानाजी पावशे, भारती फुले, अरुणा थोरात, आरोग्यसेविका भारती सोनवणे, सुजाता साळी, विजया बांबळे, सुनिता धादवड, प्रमिला कुंदे, सुमन भांगरे हा ग्रृप दररोज ॲटिजन टेस्ट करत आहेत.टाकेद येथे सुमारे साडेतिनशे टेस्ट मध्ये २३ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून या मध्ये दोन शिक्षक आहेत. तर गुरुवारी (दि.२५) अडसरे बुद्रुक येथे ८५ टेस्ट केल्या असता या मध्ये १५ पॉझिटिव रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.गत आठवड्यात टाकेद विद्यालयातील सर्वशिक्षकांना ड्युट्या लाऊन विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करून हजारों रूपये दंड वसुल केला होता. तरी आजही विना मास्क अनेक जण फिरतात. या साठी टाकेद येथे वारंवार पोलिस पेट्रोलींगची आवश्यकता आहे. सद्या बुधवारचा आठवडे बाजार बंद असून गर्दी होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.
टाकेद येथे २३ तर अडसरे बुद्रुक येथे १५ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:22 IST
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे गुरुवारी २३ तर अडसरे बुद्रुक येथे १५ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने घळबळ उडाली असून नागरीकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सरपंच तारा बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी व अडसरे बुद्रुकचे सरपंच संतू साबळे यांनी केले आहे.
टाकेद येथे २३ तर अडसरे बुद्रुक येथे १५ कोरोना बाधित
ठळक मुद्दे दररोज ॲटिजन टेस्ट करत आहेत.