शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील २२५२ सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:36 IST

लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी दूर करून ३ महिन्यांत दोष दुरु स्ती अहवाल सादर करणे बंधनकारक

ठळक मुद्दे लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी दूर करून ३ महिन्यांत दोष दुरु स्ती अहवाल सादर करणे बंधनकारक दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण अत्यंत नगण्य

नाशिक : नाशिक तालुक्यात ७ हजार ३३ गृहनिर्माण संस्था असून, यातील ४ हजार ७८१ संस्थांनी वार्षिक लेखापरीक्षण केले आहे. तब्बल २ हजार २५२ सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आॅडिट न केल्याने त्या अवसायनात काढण्यात आल्या असून, संबंधित संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी आतापर्यंतचे लेखापरीक्षण पूर्ण करावे लागणार आहे.राज्यात सहकार चळवळीचे जाळे मोठे असले तरी यातील अनेक गृहनिर्माण संस्था रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यात नाशिक तालुक्यातील सुमारे २२५२ संस्थांचा समावेश असून, त्यांना अवसायनात काढण्याच्या नोटिसाही काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संस्थांनी त्यांचे लेखापरीक्षण नियमित करून तालुका निबंधकांना अहवाल सादर न केल्यास अशा संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था आॅडिटकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही संस्था लेखापरीक्षण करून घेतात, पण तो तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करत नाहीत. सर्व संस्थांनी दिलेल्या मुदतीत लेखापरीक्षण करून घेणे सक्तीचे आहे. लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी दूर करून ३ महिन्यांत दोष दुरु स्ती अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्थांनी दरवर्षी लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक असते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण अत्यंत नगण्य होते. दरवर्षी केवळ १० ते २० टक्केच संस्था लेखापरीक्षण अहवाल सादर करत होत्या. आता या प्रमाणात वाढ होत असली तरी अजूनही २ हजार २५२ संस्थांचे आॅडिट झालेले नसल्याचे समोर आले आहे.