शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांत स्वाइन फ्लूचे २१७ बळी

By admin | Updated: March 29, 2017 23:29 IST

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ गत नऊ वर्षांत स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील २१७ नागरिकांचा बळी घेतला

विजय मोरे : नाशिक मुंबई : पुणेपाठोपाठ नाशिक शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ गत नऊ वर्षांत स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील २१७ नागरिकांचा बळी घेतला असून, २०१६ मध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच महापालिका क्षेत्रातील सरकारी दवाखान्यांमध्ये १ जानेवारी ते २५ मार्च २०१७ या कालावधीत ३८ हजार १७० रुग्णांची तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात आली असून, १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़  नाशिक जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वर्षागणिक वाढ होताना दिसून येते़ २००९, २०१०, २०१२ ते २०१५ या वर्षांमध्ये स्वाइन फ्लूचा जिल्ह्यात सर्वाधिक प्रकोप झाला़ तर २०११ व २०१६ या वर्षी स्वाइन फ्लूचे प्रमाण कमी झाले होते़ २०१५ या वर्षात जिल्हाभरात तीन लाखांहून अधिक संशयित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये २३९ नागरिकांचा स्वाइन फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते़ त्यापैकी ८७ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़  २०१६ मध्ये स्वाइन फ्लूने जिल्ह्यात डोके वर काढले नाही़ या वर्षात १६ नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दखल करण्यात आले होते़ त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला़ तर आरोग्य यंत्रणेने केलेली जनजागृती व प्रभावी उपचार पद्धती यामुळे नागरिकांचे प्राण वाचले तसेच रोगाचा फैलावही झाला नाही़ या वर्षभरात जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्ष काही दिवसांपुरताच उघडण्यात आला होता़  नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने आता पुन्हा डोके वर काढले असून, शहरासह ग्रामीण भागातही त्याचा झपाट्याने फैलाव होत आहे़ १ जानेवारी ते २५ मार्च २०१७ या कालावधीत जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद तसेच महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये तब्बल ३८ हजार १७० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे़  त्यामध्ये ७२ संशयितांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते़ त्यापैकी ६० नागरिकांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असून १८ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवून देण्यात आले, तर १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ दरम्यान, तपासणी केलेल्या नागरिकांपैकी संदिग्ध अशा २४९ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत़जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षनाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे़ या ठिकाणी औषधोपचारासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान, या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील स्वाइन फ्लू मृतांची संख्या वर्ष दाखल रुग्ण मृत्यू२००९ १२२ २२२०१० २५४ ३९२०११ ०१६ ०१२०१२ ०३७ २१२०१३ ०३४ १९२०१४ ०२२ १०२०१५ ५०८ ८७२०१६ ०१६ ०४२०१७ ०३३ १४ (२५ मार्चपर्यंत २०१७ पर्यंत)