शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात २० लाखांचे मांडूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST

नाशिक : मालेगाव -नामपूर रस्त्यावर भोसले पेट्रोल पंपासमोर मांडूळाची तस्करी करून विक्रीच्या हेतूने वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना अपर पोलीस ...

नाशिक : मालेगाव -नामपूर रस्त्यावर भोसले पेट्रोल पंपासमोर मांडूळाची तस्करी करून विक्रीच्या हेतूने वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचे मांडूळ, १ लाख रुपयांचे वाहन, १२ हजारांचे भ्रमणध्वनी,५०० रुपयांची बॅग, २ हजार ६० रुपये रोख असा २१ लाख १४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कॅम्प भागात तिघे जण मांडूळ विक्रीसाठी येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, पोलीस हवालदार भूषण खैरनार, संदीप राठोड, पंकज भोये, प्रकाश बनकर आदींनी सापळा रचला. भोसले पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या वाहनाची (क्रमांक-जेजी ०६ बीएल २६७५) तपासणी केली असता वाहनात २० लाख रुपये किमतीचे जिवंत मांडूळ आढळून आले. पथकाने रंजेश गुलाबचंद चव्हाण(३०), सावन देवराज चव्‍हाण(३०), विनिताबाई गुलाबचंद चव्हाण रा. जामदे, तालुका साक्री, जि. धुळे या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच मांडूळ व औषधी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास कॅम्प पोलीस करीत आहेत.

फोटो मेलवर पाठविला आहे.....मालेगाव मांडुूळ या नावाने