शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या स्फोटात जीव गमावलेल्यांना २० लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

एकलहरे : सुमारे दीड वर्षापूर्वी एकलहरे रोडवरील संभाजीनगर, भोर मळा येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दांपत्यासह तीन वर्षांचा ...

एकलहरे : सुमारे दीड वर्षापूर्वी एकलहरे रोडवरील संभाजीनगर, भोर मळा येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दांपत्यासह तीन वर्षांचा मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त झाले आहे. स्फोटातून बालंबाल बचावलेल्या दोघा चिमुलकल्यांचा आधार कोसळला. त्यांच्या उदरनिर्वाह व पोषणाचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब लक्षात येताच एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेत संबंधित गॅस कंपनीकडे पाठपुरावा करून सुमारे २० लाखांची रक्कम मदत म्हणून मिळवून दिली आहे.

भोर मळा येथील या घटनेत नरसिंग कांबळे व त्यांची पत्नी नम्रता कांबळे, मुले निखिल, नेहा आणि अथर्व हे सर्व गॅसच्या भडक्याने गंभीर भाजले होते. दवाखान्यात उपचार सुरू असतानाच तीन-चार दिवसांच्या अंतराने नरसिंग कांबळे (४४), पत्नी नम्रता (४०) मुलगा अथर्व (३) यांचे जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले, तर निखिल (७) नेहा (४) हेदेखील भाजलेले होते. नेहाची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारार्थ मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई व वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांची जबाबदारी आजी- आजोबांवर येऊन पडली. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नेहाच्या पुढील उपचाराचा खर्च कसा करावा याची चिंता त्यांना सतावत होती. याबाबतची माहिती जानोरी (ता. दिंडोरी) येथील कानिफनाथ महाराज मंदिराचे संस्थापक रहाणे यांच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या सेवा संस्थेला मिळाली. या संस्थेने पुढाकार घेऊन कुटुंबाला आर्थिक मदतीचा लाभ मिळवून दिला, तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडे तक्रार नोंदवली. एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर सुमारे २० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत विम्याच्या स्वरूपात नेहा व निखिल या भावंडांना मिळाली.

चौकट===

या सामाजिक कार्यात हातभार लावणारे भारत पेट्रोलियमच्या प्रणाली मेश्राम, व्यवस्थापक गुप्ता, गॅस एजन्सीचे राजेश महाले, युवराज जगळे, हवालदार विलास उजागरे व जखमींवर उपचार करणारे डॉ. राजेंद्र नेहते यांचा रहाणे बाबा सेवा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.