शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

नर्सरीतील २ लाख ६५ हजार रोपे पाण्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:40 IST

खर्डे : येथे वन विभागाच्यावतीने नर्सरी तयार करण्यात आली असून, नर्सरीत जवळपास २ लाख ६५ हजार रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देलागवडीसाठी उत्कृष्ट पद्धतीने टवटवीत तयार झाले आहेत.

खर्डे : येथे वन विभागाच्यावतीने नर्सरी तयार करण्यात आली असून, नर्सरीत जवळपास २ लाख ६५ हजार रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. या नर्सरीत करंज, आवळा, बोर, बांबू, रामकाठी, कांचन, गुलमोहर, चिंच, बेडा, रेनट्री, शेवगा, हातगा, तुती, अंजन, शिवण, शिसव, पळस, खैर, पापडी आदी जातींच्या रोपांचा समावेश आहे. खर्डे परिसरात भीषण पाणी टंचाई असतांना देखील येथील शेतकरी राजाराम आहिरे यांच्या शेतात वनविभागाने कूपनलिकेच्या तसेच ट्रँकरच्या पाण्यावर नर्सरीत विविध जंगली जातीचे रोपे लागवडीसाठी उत्कृष्ट पद्धतीने टवटवीत तयार झाले आहेत.यावर्षी खर्डे परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. खर्डे ग्रामपंचायतीची वार्शी धरणालगत असलेली उद्धभव विहिरीने तळ गाठल्याने लगतची विहीर अधिग्रहित करून येथे आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणत पाणी टंचाई असताना देखील वन विभागाने या ठिकाणी नर्सरी तयार करून रोपे लागवडी योग्य केली आहेत. तसेच नर्सरीतील रोपांची लागवड करण्यासाठी वनपरिक्षेत्रातील शेरी, वाजगांव, वार्शी, हनुमंतपाडा व कांचणे येथे खड्डे देखील खोदून ठेवली आहेत. शासनाच्या वतीने दरवर्षी प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीचे उदिष्टय दिले जात असून, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते.मात्र त्याचे संगोपन पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने त्याची आकडेवारी फक्त कागदावर राहते. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यासाठी वृक्ष जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. जून मिहना संपत आला तरी देखील पावसाचे चिन्ह दिसत नसल्याने ग्रामीण भागात मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यात नर्सरीतील तयार रोपे पाण्याअभावी जगवणे वनविभागाला देखील आता जिकरीचे झाले असून, लवकर पाऊस पडावा यासाठी सर्वजण प्रतीक्षा करीत आहेत. खर्डे येथील नर्सरीतील रोपे लागवडी योग्य झाले असून, पाऊस पडत नसल्याने आहे त्या पाण्यावर ते जगविण्यासाठी वनविभागाचे वनपाल पी. पी. सोमवंशी, वनरक्षक राहुल बच्छाव आदींसह वनसेवक, कर्मचारी परिश्रम घेतांना दिसत आहे.(फोटो २२ खर्डे)खर्डे, ता. देवळा येथे वनविभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नर्सरीत टवटवीत दिसत असलेली रोपे .