शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

जिल्ह्यात १८ लाख वाहने अन‌् पीयूसीची चाचणी केवळ ५ हजार वाहनांचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:25 IST

नाशिक : वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारे हानिकारक वायूचे प्रमाण नियंत्रणात राहावे, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची चाचणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे १७ लाख ७७ हजार ४७४ वाहने रस्त्यांवर धावत असल्याची नोंद आरटीओच्या दप्तरी आहे; मात्र यापैकी पीयूसी चाचणी करत प्रमाणपत्र मिळविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. जेमतेम ५ हजार २५८ वाहनांची पीयूसी चाचणी झाली आहे.

ठळक मुद्दे१९८ पीयूसी सेंटर : साडेनऊ लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रणाबाबत उदासीनता

नाशिक : वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारे हानिकारक वायूचे प्रमाण नियंत्रणात राहावे, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची चाचणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे १७ लाख ७७ हजार ४७४ वाहने रस्त्यांवर धावत असल्याची नोंद आरटीओच्या दप्तरी आहे; मात्र यापैकी पीयूसी चाचणी करत प्रमाणपत्र मिळविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. जेमतेम ५ हजार २५८ वाहनांची पीयूसी चाचणी झाली आहे.नाशिककर दरवर्षी मोठ्या संख्येने दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने रस्त्यावर आणतात. शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असून, दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारा कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइडसारख्या घातक वायूंचे प्रमाण कमी राहावे, याकरिता वाहनांची पीयूसी चाचणी केली जाते. पीयूसी प्रमाणपत्राची वैधता ही वर्षभरासाठी असते. पीयूसी प्रमाणपत्र मिळविणे हे अत्यंत सोपे व कमी खर्चीक असूनदेखील उदासीन नाशिककरांकडून आपल्या वाहनांची चाचणी करून ते सोबत बाळगले जात नसल्याचे समोर येते. एकूणच प्रदूषणाला आळा घालून नाशिकची ह्यहवाह्ण शुद्ध ठेवण्यासाठी नाशिककरांकडून मात्र कानाडोळा केला जात आहे.मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी प्रमाणपत्र जर सोबत नसेल तर कलम-१९०(२) नुसार दंडात्मक कारवाईसाठी संबंधित वाहनचालक पात्र ठरतो. प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार निरीक्षकांसह वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.असे आहेत प्रदूषित वाहने तपासणीचे दरकार- (हलकी वाहने)- ९० ते १२० रुपयेदुचाकी- ३५ रुपयेट्रक (जड वाहने)- १२० रुपये९४५ गुन्हे दाखलएप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुमारे ५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ९४५ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच एकूण ९ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.वाहन इन्शुरन्स हवाय, मग पीयूसी काढावाहन विमा उतरविणाऱ्या सर्वच कंपन्यांकडून वाहनांचा विमा काढताना पीयूसी प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे दुचाकीपासून चार चाकी वाहनांपर्यंत ज्या वाहनचालकांना आपल्या वाहनांचा विमा काढायचा असेल त्यांना तत्पूर्वी वैध पीयूसी प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे आता पीयूसी चाचणीचे प्रमाण वाढणार आहे.जिल्ह्यातील एकूण वाहने - १७,७७,४७४जिल्ह्यातील पीयूसी सेंटर- १९८ 

टॅग्स :GovernmentसरकारTrafficवाहतूक कोंडी