शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

१७४ कोटींची थकबाकी

By admin | Updated: April 2, 2017 00:11 IST

जिल्हा बॅँकेची वणी शाखा : आर्थिक अडचणींचे आव्हान

वणी : शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून परिचित असलेली जिल्हा बँक सोसायटी व विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचा कर्जपुरवठा करते; मात्र कर्जवाटप व कर्जवसुली यातील असमन्वयामुळे तसेच कर्जमाफीच्या अस्पष्ट धोरणामुळे जिल्हा बँकेच्या वणी शाखेची थकबाकीची रक्कम तब्बल १७४ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरात पोहोचल्याने आर्थिक अडचणीचा सामना करण्याची वेळ जिल्हा बँकेवर आली आहे.वणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रात ३२ संस्थांचा समावेश आहे. त्यात काही आदिवासी सहकारी संस्था (सोसायट्या) तर काही विविध कार्यकारी संस्था आहेत. १२ आदिवासी संस्था, तर २० बिगर आदिवासी संस्था अशी त्यांची वर्गवारी आहे. वणी, मावडी, माळेदुमाला, पिंप्री अंचला, चौसाळे, भनवड, वारे, कोशिंबे, पिंपरखेड, करंजवण, म्हेळुस्के, नळवाडी, खेडले, दहेगाव, लखमापूर, ओझरखेड, आंबे वणी, राजापूर, वरखेडा, जोपूळ, लोखंडेवाडी, मातेरेवाडी, सोनजांब, बोपेगाव, चिंचखेड, तिसगाव, तळेगाव वणी, शिंदवड, खेडगाव, स्मॉल, खेडगाव बु।।, दहिवी, जऊळके वणी अशी त्यांची नावे आहेत. संस्थेचे एकूण खातेदार २७ हजार २१२ आहेत. पैकी संस्थेचे सभासद २०६६७ आहेत. पैकी कर्जदार सभासद १३५१९ आहेत. एकूण येणे कर्ज ३२० कोटी २७ लाख रुपये असून, त्यात कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे. दरम्यान, कर्जमाफीची मागणी सातत्याने पुढे येत असल्याने थकबाकी भरणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने कर्ज भरावे की भरू नये, अशी स्थिती निर्माण झाल्याचा सुर उमटतो आहे. त्यात कृषी उत्पादित माल त्यात बहुतांशी टमाटा कांदे द्राक्ष या नगदी पिकांना बाजारभाव अपेक्षित मिळाला नाही. तोही फटका वसुलीला बसल्याची चर्चा आहे. या सगळ्या द्राविडी प्राणायामाचा लेखाजोखा बघितला तर जिल्हा बँकेला वसुलीसाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्या कारवाईच्या पूर्ततेसाठी योग्य ती कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे. कारण काही कर्जदारांची परिस्थिती कर्ज अदा करण्याइतपत नसली तरी ज्यांची आहे त्यांची मानसिकता ओळखून कार्यप्रणाली राबविण्याचे आव्हान संबंधितांपुढे असले तरी थकबाकीचा आकडा पाहता अर्थप्रणालीचा वेग कायम राखणे कामी संबंधिताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. (वार्ताहर)