शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सावतानगरला ऑक्सिजन बेडसह १६० खाटांचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

बुधवारी (दि. १४) रोजी वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड व अधिकाऱ्यांनी या कोविड सेंटरची पाहणी करीत काही सूचना केल्या. कोरोनाचे ...

बुधवारी (दि. १४) रोजी वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड व अधिकाऱ्यांनी या कोविड सेंटरची पाहणी करीत काही सूचना केल्या. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना उपचारासाठी कोविड सेंटर नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. मनपाकडून सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील सावतानगर येथील क्रॉम्प्टन हॉल (सावरकर हॉल) येथे ६० ऑक्सिजन बेड व रायगड चौक मनपा शाळेत १०० बेड असे १६० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून दोन दिवसांत हे दोन्ही कोविड सेंटर सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितली.

शहरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सिडको भागात आहेत. त्यामुळे सिडको विभाग कोरोना हॉटस्पॉट झाला आहे. मनपाचे शहरातील सर्व विभागात कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर आहे. परंतु सिडको भागात कोरोना रुग्ण असूनही कोविड सेंटर नव्हते, त्यामुळे सिडको भागातील सर्वसामान्य असलेल्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी नाशकातील मनपाचे झाकीर हुसेन हॉस्पिटल किंवा नाशिक रोड भागातील बिटको हॉस्पिटल येथे जावे लागत होते. कित्येकदा तेथील हॉस्पिटल फुल्ल असल्याने सिडकोतील रुग्णांना परत पाठविले जात होते. सर्वसामान्य रुग्णांना अखेर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. मागील वर्षी कोरोना रुग्ण वाढल्यानंतर सिडकोतील सावतानगर भागात कोविड सेंटर उभारावे व या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू विभाग यासह सुविधा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती.

कोट===

गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णांना बेडदेखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे सिडको भागातही कोविड सेंटर सुरू करण्याचे मनपाकडे मागणी केली. परंतु मनपाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने प्रभागातील एम.डी. फिजिशियनसह सुमारे १२ डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे.

-सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख शिवसेना

(फोटो डेस्कॅनवर)