शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विनंती बदल्यांसाठी १५० अर्ज; केवळ आठच अर्ज मंजुरीसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : ऑगस्ट महिन्यापासून महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदली आणि पदोन्नतीचे सत्र सुरू असून विनंती बदलीसाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल ...

नाशिक : ऑगस्ट महिन्यापासून महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदली आणि पदोन्नतीचे सत्र सुरू असून विनंती बदलीसाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल १५० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अर्जांची संख्या मोठी असली तरी सबळ कारणे असलेल्या केवळ आठच अर्जांचा विचार करण्यात आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी देखील पसरली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या आणि पदोन्नतीची कार्यवाही महसूल विभागात सुरू झाली आहे. गेल्या ६ तारखेला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मध्यंतरी प्रशासकीय बदल्यांचेदेखील आदेश काढण्यात आले. ३० ऑगस्ट रोजी २२ तलाठी आणि २३ अव्वल कारकून यांच्यादेखील समुपदेशाने बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मागीलवर्षी ज्या बदल्या वादग्रस्त ठरल्या होत्या अशा बदल्यांच्याबाबतीत मॅट न्यायालयाच्या निर्णयानुसार देखील कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे मागील संपूर्ण महिना हा बदली आणि पदोन्नती प्रक्रियेतच पार पडल्याचे दिसते. सर्व प्रशासकीय जबाबदारी सांभाळून बदली संदर्भातील कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, महसूल विभागात विनंती बदल्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तब्बल १५० अर्ज प्राप्त झाले असून मंडळाधिकारी, अव्वल कारकुनांनी बदलीसाठी विनंती केली आहे. अर्जांची संख्या मोठी असली तरी जिल्हाधिकारी मांढरे यांनी बदलीसाठी सबळ कारण असलेले केवळ ८ विनंती अर्ज मान्य करून विभागीय महसूल आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवले असल्याचे समजते. आलेले अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांना सादर करण्याची मुदत आहे. त्यामुळे अर्जांची छाननी करून केवळ अत्यंत सबळ कारण असलेल्यांची विनंती मान्य करण्यात आले आहेत. त्यानुसार केवळ ८ अर्जच प्रशासनाने मंगळवारी (दि.३१) विभागीय आयुक्तांकडे सादर केले आहेत. या बदल्यांबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले.