शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा चारचाकीची काच फोडून १५ लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST

नाशिक : शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चारचाकी वाहनाची काच फोडून तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटल्याची ...

नाशिक : शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चारचाकी वाहनाची काच फोडून तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयितांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईनाका परिसरातील हॉटेल छानजवळ शुक्रवारी (दि. ५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दोघा संशयितांनी चारचाकी (एमएच १५ एचजी २८६८) मधून मागील काच फोडून १५ लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग चोरून नेली. या प्रकरणी मयूर राजेंद्र भालेराव (रा. नावदरवाजा) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मयूर दुपारी ४ वाजेच्या सुमारास हॉटेल छानच्या परिसरात गाडीजवळ उभा असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या चारचाकीची मागील काच फोडून पैसे असलेली बॅग उचलून नेली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली असून पोलिसांची चार पथके संशयितांच्या तपासासाठी रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी युवक हा कर्मचारी असून तो चोरी झालेली रक्कम द्वारका येथून मुंबईनाक्याकडे पोहोचविण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

===Photopath===

050221\05nsk_52_05022021_13.jpg

===Caption===

चारचाकी वाहनाची काच फोडून १५ लाख रुपयांची चोरी