शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
6
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
7
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
8
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
9
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
10
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
11
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
12
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
13
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
14
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
15
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
16
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
17
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
18
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
19
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
20
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!

दिंडोरीत एकाच दिवशी १३,७८८ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

कोरोनापासून बचाव करावयाचा असेल तर लसीकरण हे एकमेव पर्याय दिसत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागापुढे एक आव्हानच होते ...

कोरोनापासून बचाव करावयाचा असेल तर लसीकरण हे एकमेव पर्याय दिसत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागापुढे एक आव्हानच होते सुरुवातील लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पाठफिरवली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना समजल्याने लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

शुक्रवारी (दि.१७) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यातून १३,७८८ लसीकरणाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यात मोहाडी आरोग्य केंद्र १९३९, कोचरगाव ९६२, निगडोळ ६३०, ननाशी १०५९, पांडणे १७८६, तळेगाव दिंडोरी १८००, उमराळे १४०८, वरखेडा १२८४, वारे ९९८, खेडगाव १५९६ तसेच ग्रामीण रुग्णालय दिंडोरी २००, ग्रामीण रुग्णालय वणी १५५ असे एकूण १३७८८ लसीकरण करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत २,३६,७८२ पैकी पहिला डोस ११६३१० (४९ टक्के), दुसरा डोस ३४६६९ (१५ टक्के) एकूण लोकसंख्येनुसार ६३.८ टक्के काम झाले असून, १,५०,९७९ इतके नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य समुदाय अधिकारी, उपकेंद्र येथील सर्व आरोग्य सेवक-सेविका, आशा गटप्रवर्तक, आशा कार्यकर्ती आदी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहेत.

कोट...

कोरोनापासून बचाव करण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत असून, तालुक्यातील त्यांच्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून एक आदर्श निर्माण करू व आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून दिंडोरी तालुका कायमस्वरूपी कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

- डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी

(२० दिंडेारी)

लसीकरणावेळी जानोरी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष मांडगे, सोबत संजय गायकवाड, संतोष पवार, माया पांडे, डॉ. सियॉन राहुल, आरोग्यसेविका मंदा शिंदे आदी.

200921\20nsk_51_20092021_13.jpg

लसीकरणावेळी जानोरी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष मांडगे, सोबत संजय गायकवाड, संतोष पवार, माया पांडे, डॉ. सियॉन राहुल, आरोग्यसेविका मंदा शिंदे, आदी.