शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: November 6, 2015 22:04 IST

एलबीटी : विवरणपत्र दाखल न केल्यास कारवाई

नाशिक : राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील विवरणपत्र दाखल न करणाऱ्या थकबाकीदारांना महापालिकेने करभरणा करण्याचे आवाहन केले होते. त्याची मुदत ३१ आॅक्टोबरला संपूनही विवरणपत्र दाखल न करणाऱ्या १३ हजार १३६ व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत प्रतिसाद न मिळाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबर बॅँक खाती सील केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आत ज्या व्यापाऱ्यांची खरेदी व विक्रीची उलाढाल आहे, अशा व्यापाऱ्यांचा एलबीटी १ आॅगस्ट २०१५ पासून रद्द केला आहे. त्यामुळे सुमारे ३३ हजार व्यापाऱ्यांची एलबीटीपासून मुक्तता झाली आहे. मात्र, महापालिकेकडून ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर कर आकारणी सुरूच आहे. दरम्यान, राज्य शासनाने १ आॅगस्टपासून ५० कोटींच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द केला असला तरी, चालू आर्थिक वर्षातील १ एप्रिल ते ३१ जुलै २०१५ या कालावधीतील विवरणपत्र दाखल करणे व्यापाऱ्यांना अनिवार्य आहे. असंख्य व्यापाऱ्यांनी एलबीटी माफ झाल्याच्या घोषणेनंतर महापालिकेकडे विवरणपत्र दाखल केलेले नाही. महापालिकेने अशा करभरणा व विवरणपत्र मुदतीत दाखल न केलेल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करत, १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील विवरणपत्र भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. प्रामुख्याने १ एप्रिलनंतर ९० दिवसांच्या आत व्यापाऱ्यांनी विवरणपत्र भरणे बंधनकारक असते; परंतु अनेकांनी मुदतीत विवरणपत्र दाखल केले नसल्याने महापालिकेने मुदत वाढवून दिली होती. मात्र, आता दि. ३१ आॅक्टोबरला मुदत संपूनही १३ हजार १३६ व्यापारी-व्यावसायिकांनी विवरणपत्रासह थकबाकीचा भरणा केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यापाऱ्यांनी नोटीस बजावल्यापासून पंधरा दिवसांच्या आत विवरणपत्र दाखल न केल्यास त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारला जाणार असून, त्यांची बॅँक खाती सील करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे फडोळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)