शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी १२५ तक्रारी

By admin | Updated: September 17, 2015 00:07 IST

मनपाचे अ‍ॅप्स : दोन हजार नागरिकांकडून अ‍ॅप्स डाऊनलोड

नाशिक : महापालिका अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आणलेल्या मोबाइल अ‍ॅप्सवर पहिल्याच दिवशी सुमारे १२५ तक्रारी दाखल झाल्या, तर सुमारे दोन हजार नागरिकांनी अ‍ॅप्स डाउनलोड केले. ड्रेनेज, आरोग्य व विद्युत विभागातील सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांना आता घरबसल्या तक्रारींची सुविधा प्राप्त झाली असली, तरी प्रशासनाला दिलेल्या मुदतीत तक्रारींचे निवारण करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या ‘स्मार्ट नाशिक’ या मोबाइल अ‍ॅप्सचे लोकार्पण मंगळवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाल्यानंतर दीड दिवसात शहरातील सुमारे दोन हजार नागरिकांनी अ‍ॅप्सचे रजिस्ट्रेशन करत डाउनलोड करून घेतले. त्यानंतर, बुधवारी पहिल्याच दिवशी अ‍ॅप्सवर सुमारे १२५ तक्रारी प्राप्त झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वसाधारपणे, महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे महिन्याला सुमारे ३२५ ते ३५० तक्रारी प्राप्त होत असतात. परंतु आता मोबाइल अ‍ॅप्समुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारी अथवा सूचना मांडणे शक्य होणार आहे. महापालिकेच्या या अ‍ॅप्सबाबत नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिकेच्या गतिमान प्रशासनाचे कौतुक केले जात असतानाच या अ‍ॅप्सच्या उपयुक्ततेबाबत शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. प्रामुख्याने नगरसेवकांकडून अ‍ॅपपेक्षा प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा गॅप भरून काढण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी अ‍ॅपवर तक्रार दाखल केल्यानंतर त्याची दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी करण्याचे आव्हान आता प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. आयुक्तांनीही त्याबाबत पुढील दोन महिने आव्हानात्मक असल्याची कबुली दिली आहे. या गतिमान प्रशासनाचा धसका आता काही अधिकाऱ्यांनीही घेतला असून ‘रात्रंदिन आता आम्हा युद्धाचा प्रसंग’अशी टीपणीही महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (प्रतिनिधी)