शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १००० टमरेल जप्त

By admin | Updated: March 11, 2017 00:50 IST

कळवण : स्थानिक स्तरावर विविध कल्पनेतून बांधण्यात येणाऱ्या शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे.

 कळवण : स्थानिक स्तरावर विविध कल्पनेतून बांधण्यात येणाऱ्या शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने हगणदरी-मुक्तीसाठी घरातून टमरेल जप्ती करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.तालुक्यात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८६ ग्रामपंचायतीत टमरेल जप्ती अभियान राबविण्यात आले. या अभियानात तालुक्यातून एकाच दिवशी सुमारे १००० टमरेल जप्त केले असून, या टमरेलवर उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे नाव लिहून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाने कळवण पंचायत समितीच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. पाण्याने भरलेले टमरेल घेऊन त्यांचा नावासगट पंचनामा करण्याचा निर्णय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी घेतला आहे. तालुक्यात टमरेल जप्ती मोहीम राबविण्यात आली असून, जप्त केलेल्या टमरेलवर त्या व्यक्तीचे नाव लिहून ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेतला आहे. हागणदारीमुक्त गाव योजनेत सहभाग घेतलेल्या तसेच अन्य गावातील नागरिकांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी वारंवार प्रबोधन करूनही त्याचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या कारवाईत नेमणूक केलेल्या गावात गुडमॉर्निंग पथकाने सकाळी हजेरी लावली. एकाच वेळी ८६ गावात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदिंनी सहभाग घेतला. शासनामार्फत शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रु पये अनुदान देण्यात आले असून, ज्यांनी शौचालये बांधली ते नागरिक त्याचा वापर करत नसल्याचे निर्दशनास आले आहे. अशा नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.