शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याजवळ क्रूझरचे टायर फुटून १० जणांचा मृत्यू; साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:16 IST

येवला : कोळपेवाडी येथे साखरपुडा आटोपून धुळे येथे परतत असताना क्रूझरचे टायर फुटून ती मारुती ओम्नी व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार झाले असून, पंधराहून अधिक लोक जखमी आहेत. येवला-मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारात रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. याचवेळी पल्सर मोटारसायकल एसटीवर आदळून अन्य एक अपघात ...

येवला : कोळपेवाडी येथे साखरपुडा आटोपून धुळे येथे परतत असताना क्रूझरचे टायर फुटून ती मारुती ओम्नी व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार झाले असून, पंधराहून अधिक लोक जखमी आहेत. येवला-मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारात रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात झाला. याचवेळी पल्सर मोटारसायकल एसटीवर आदळून अन्य एक अपघात झाल्याने एकाच ठिकाणी चार वाहनांचा अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींची संख्या अधिक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.या चार वाहनांच्या अपघातस्थळाचे दृश्य भयानक होते. अपघातस्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता. तसेच मृतांचे अवयव सर्वत्र विखुरले होते. एसटी बसचे किरकोळ नुकसान झाले. क्रूझर तसेच ओम्नी गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून बाहेर काढले. वाहतूकदेखील सुमारे तासभर ठप्प झाली होती. दरम्यान, निजधाम व सावरगाव परिसरातील पवारांच्या गोतावळ्याने केलेल्या मदतीमुळे केवळ २० मिनिटात मदत कार्य करीतअपघात ग्रस्तांना दवाखान्यात उपचारासाठी पाठवले. अपघातातील जखमींची संख्या जास्त असल्याने खाजगी डॉक्टर किशोर पहिलवान, डॉ. संजय जाधव, डॉ भूषण शिनकर, डॉ कुलकर्णी यांनी ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयामध्ये येऊन शासकीय वैद्यकीय अधिकाºयांना उपचारासाठी मदत केली. भारती राव, (धुळे), पियुष तिवारी, दिपा तिवारी, शिनू तिवारी रा. इटावा, उत्तरप्रदेश, लोटन चित्ते (धरणगाव जि.जळगाव), पवन जाधव (दोंडाईचा) या जखमींना येवला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह टीमने जखमींना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली.पोलीस उपाधीक्षक डॉ राहुल खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.अपघातातील मृतांची नावेआदित्य बबन मरसाळे (१२), रा. फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगर , धुळे, यश महेश राव (१०) रा. सुरत ,(गुजरात), महेश दिलीप राव (४२), रा. फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगर, धुळे, ओम्नी चालक संजय हरी सोनवणे (३२) रा. अयोध्यानगर, मनमाड, निशांत मनोज तिवारी,(२३), रिटा अतुल तिवारी, (२६), शुभा तिवारी, लक्ष्मीकांत दीक्षित सर्व रा. इटावा, जि. बाकेनार, अन्य दोन मृतांची नावे समजू शकली नाही.अपघातातील गंभीर जखमीभारती महेश राव (सुरत), गुड्डी मरसाळे (जळगाव), स्वप्नील बाविस्कर (धुळे), योगेश रवींद्र मरसाळे (धुळे), भूषण संजय गांगुर्डे (धुळे), इंदूबाई चित्ते (धरणगाव, जळगाव), लताबाई प्रकाश गांगुर्डे (धुळे), वंश राजू गांगुर्डे (धुळे), मोहित राजू गांगुर्डे (धुळे), ज्योती राजू गांगुर्डे (धुळे), आदी मरसाळे (धुळे), पिंटू राव (सुरत), विजय प्रकाश गांगुर्डे (धुळे) आदी.क्रूझर गाडीतील अपघातग्रस्त धुळे भागातील असून, ते कोळेपेवाडी येथून साखरपुड्याचा कार्यक्र म आटोपून धुळे येथे घरी परतत होते. क्रूझरमध्ये १५ ते १६ जण प्रवास करीत होते. ज्याचा साखरपुडा होता तो नवरामुलगा विजय गांगुर्डे रा. धुळे हा गाडीमध्ये जागा नसल्याने मित्राबरोबर मागून मोटारसायकलवर येत होता. त्यामुळे तो या अपघातातून बचावला.